‘तू भीक मागशील…’, आई गोविंदालाअसं का म्हणाली? ज्यामुळे अभिनेताही हैराण

गोविंदा आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसला तरी, त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात, एका प्रसंगाबद्दल सांगताना खुद्द अभिनेता म्हणाला...

'तू भीक मागशील...', आई गोविंदालाअसं का म्हणाली? ज्यामुळे अभिनेताही हैराण
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 11:26 AM

Govinda On His Mother Warning : एका काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर अभिनेता गोविंदा, सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या अभिनेत्यांचं राज्य होतं. आता बॉलिवूडमध्ये अनेक नवीन अभिनेत्यांनी पदार्पण केलं असलं तरी, ९० च्या दशकातील अभिनेत्यांची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अभिनेता गोविंदा आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसला तरी, त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात. एवढंच नाही तर, खुद्द अभिनेता त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतो. सिनेविश्वात यशाच्या उच्च शिखरावर चढत असताना गोविंदाने गुपचूप लग्न केलं. कोणाला अभिनेत्याच्या लग्नाबद्दल काहीही कळालं नाही. अशात गोविंदा यांचं नाव कायम त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलं.

यशाच्या पायऱ्या चढत असताना अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी सर्वांसमोर आल्या. गोविंदाच्या पत्नी सुनीता आहूजा (Sunita Ahuja) आणि त्याच्या आईचं नातं प्रचंड घट्ट होतं. एकदा गोविंदाच्या आई असं काही म्हणाल्या जे ऐकून खद्द अभिनेता देखील हौराण झाला. ज्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आजही 'कॉमेडीचा बादशाह' म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळापासून हा पुतण्या कृष्णा अभिषेकबरोबरील वादामुळे तो चर्चेत आहे.गोविंदा जेवढा चर्चेत आहे तेवढाच त्याची पत्नीही चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘सुनीताची फसवणूक करशील तर तू भीक मागशील… तेव्हा मी आईला म्हणालो तू सुनीतावर एवढं प्रेम करते, त्यावर आई म्हणाली, ती लक्ष्मी आहे.’ आईच्या या वक्तव्यानंतर अभिनेता गोविंदा हैराण झाला. आता अभिनेता अनेक ठिकाणी पत्नी सुनीता यांच्यासोबत दिसतो.

गोविंदा आणि सुनीता यांनी १९८७ मध्ये गुपचूप लग्न केलं. सर्वांपासून लग्न लपवण्याचं कारण सांगत सुनीता म्हणाल्या, ‘लग्नाची त्यावेळी घोषणा नाही केली, कारण तेव्हा सेलिब्रिटींनी लग्न करणं म्हणजे करियर संपलं… आणि आमचं लग्न अशावेळी झालं जेव्हा गोविंदा यशाच्या शिखरावर चढत होते.’

पुढे सुनीता म्हणाल्या, ‘मी त्यांना सांगितलं एका वर्षात जेवढे सिनेमे साईन करता येतात करा. आपण लग्न सिक्रेट ठेवू. पण जेव्हा आमची मुलगी टीनाचा जन्म झाला तेव्हा तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही लग्नाची घोषणा करण्याचा निर्णय घेतला.’ लग्नानंतर जेव्हा गोविंदाच्या घरी पाहुणे यायचे तेव्हा सुनीता त्यांच्या खोलीत लपायच्या. जेणे करून त्यांना कोणी पाहणार नाही. असं देखील सुनीता म्हणाल्या होत्या.

गोविंदा व  सुनीताची आई दोघीही या नात्याला सुरुवातीपासूनच सहमत होत्या.  गोविंदा सुरुवातीला सुनीता आहुजासोबत भांडत असे. सुनीताच्या मोठ्या बहिणीचे लग्न गोविंदाचे मामा आनंद सिंग यांच्याशी झाले होते.

दोघे तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी सुनीताचा गोविंदासोबत विवाह झाला होता. .गोविंदा 1987 साली लग्नबंधनात अडकले. नीता आहुजा आणि आज गोविंदा आणि सुनीता यांना दोन मुले आहेत. मुलगी नर्मदा (टीना) मोठा आणि मुलगा यशवर्धन. तसं पाहिलं तर आजही गोविंदाची महिला फॅन फॉलोइंग आहे, जी कोणीही नाकारू शकत नाही. चित्रपटांमध्ये नाही तर गोविंदा म्युझिक व्हिडिओंमध्ये सक्रिय दिसतो..

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.