गोविंदा यांचा मुलगा यशवर्धन आहे दमदार डान्सर, वडिलांसोबत धरला ठेका, व्हिडीओ पाहून म्हणाल…
Yashvardhan Ahuja | गोविंदा यांची मुलगा यशवर्धन याच्यासोबत जुगलबंदी... वडिलांप्रामाणे भन्नाट डान्सर आहे यशवर्धन... दोघांच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बाप-लेकाच्या व्हिडीओची चर्चा... चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव...
अभिनेते गोविंदा यांनी कायम चाहत्यांना आपल्या विनोदबुद्धीने हसवलं. आता गोविंदा अभिनय विश्वात पूर्वीप्रमाणे सक्रिय नसले तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. चाहत्यांमध्ये देखील गोविंदा यांची चर्चा रंगलेली असते. काही दिवसांपूर्वी गोविंदा भाची आरती सिंग हिच्या लग्नात सहभागी झाल्यामुळे चर्चेत आले होते. गोविंदा यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा यशवर्धनही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. यशवर्धन त्याच्या लूक आणि डान्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत अशतात.
आता देखील गोविंदा आणि मुलगा यशवर्धन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यशवर्धन देखील वडिलांप्रमाणे वडिलांप्रमाणेच चांगला डान्सर आहे असे म्हणणे चुकीचं ठरणार नाही. व्हायरल व्हिडीओवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये यशवर्धन आणि गोविंदा एका पार्टीमध्ये डान्स करताना दिसणार आहे. दोघे देखील व्हिडीओमध्ये दमदार डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये, गोविंदा यांच्या ‘कुली नंबर वन’ या हिट सिनेमातील गोरिया चुराना मेरा जिया… हे गाणे वाजत आहे, ज्यावर गोविंदा त्यांच्या डान्स मूव्हज करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये मुलगा यशवर्धन देखील वडिलांच्या सिग्नेचर स्टेप सेम-टू-सेम कॉपी करताना. दोघांमध्ये कांटे की टक्कर दिसत आहे. सांगायचं झालं तर, गोविंदा आणि त्यांचा मुलगा यशवर्धन यांची ही जुगलबंदी लोकांना खूप आवडली आहे. पिता-पुत्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, यशवर्धन त्याच्या वडिलांप्रमाणेच गुड लुकिंग आहे. यशवर्धन याने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण यशवर्धन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. यशवर्धन हा अशा स्टार किड्सपैकी एक आहे ज्यांना प्रसिद्धीझोतात राहणं आवडत नाही.
यशवर्धन सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो स्वतःचे डॅशिंग फोटो देखील पोस्ट करत असतो. मिळालेल्या माहितीनुसार यशवर्धन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, यशवर्धनला कॅमेरासमोर येण्यापूर्वी कॅमेऱ्यामागील सर्व कामे शिकायची आहेत. सध्या यशवर्धन अभिनय आणि डान्सचं प्रशिक्षण देखील घेत आहे.