गोविंदाच्या आईने नाकारलं, धर्मेंद्र यांनीही सून बनवून घेण्यास दिला नकार; फोटोत दिसणारी ‘ही’ चिमुकली आहे तरी कोण?

अभिनेत्रीचा लहानपणीचा हा फोटो असून त्यात ती तिच्या कुटुंबीयांसोबत पोझ देताना दिसतेय. फोटोत गोड हसणारी ही चिमुकली 90 च्या दशकातील कोणती अभिनेत्री आहे, हे तुम्ही ओळखू शकाल का? तिच्याबाबत हिंट द्यायची झाल्यास, गोविंदाचं तिच्यावर प्रेम जडलं होतं.

गोविंदाच्या आईने नाकारलं, धर्मेंद्र यांनीही सून बनवून घेण्यास दिला नकार; फोटोत दिसणारी 'ही' चिमुकली आहे तरी कोण?
bollywood actressImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 8:56 AM

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत 80 आणि 90 च्या दशकात अशा बऱ्याच अभिनेत्री होत्या, ज्यांनी आपल्या सौंदर्याच्या आणि दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही त्या अभिनेत्रींची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. त्यातल्या काही अभिनेत्री या सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन प्रयोग करताना दिसत आहेत. 90 च्या दशकातील अशाच एक अभिनेत्रीचा ‘फॅमिली फोटो’ सोशल मीडियावर समोर आला आहे. अभिनेत्रीचा लहानपणीचा हा फोटो असून त्यात ती तिच्या कुटुंबीयांसोबत पोझ देताना दिसतेय. फोटोत गोड हसणारी ही चिमुकली 90 च्या दशकातील कोणती अभिनेत्री आहे, हे तुम्ही ओळखू शकाल का? तिच्याबाबत हिंट द्यायची झाल्यास, गोविंदाचं तिच्यावर प्रेम जडलं होतं.

या जुन्या विंटेज फोटोमध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दडलेली आहे. ही चिमुकली नक्की कोण आहे, हे जर तुम्हाला अजूनही ओळखता आलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. ही अभिनेत्री आहे नीलम कोठारी. नीलम कोठारीने 1984 मध्ये ‘जवानी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘हम साथ साथ है’, ‘खुदगर्ज’, ‘दूध का कर्ज’, ‘इल्जाम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2020 मध्ये ती नेटफ्लिक्सच्या ‘फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या सीरिजमध्ये झळकली होती. वयाच्या 56 व्या वर्षीही तिचं सौंदर्य तरुण अभिनेत्रींना टक्कर देणारं आहे. नीलम फक्त उत्तम अभिनेत्रीच नाही तर ज्वेलरी आर्टिस्टसुद्धा आहे. 2019 मध्ये तिने ज्वेलरी डिझाइनसाठी आयकॉनिक अचिव्हर्स अवॉर्ड पटकावला होता.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Neelam (@neelamkotharisoni)

नीलम तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे बरीच चर्चेत होती. तिचं नाव बॉलिवूडचा हँडसम हंक बॉबी देओलपासून गोविंदापर्यंत जोडलं गेलं होतं. मात्र या दोघांशीही तिचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. गोविंदाच्या आईला नीलमसोबतचं त्याचं नातं पसंत नव्हतं असं म्हटलं जातं. तर धर्मेंद्र यांनीसुद्धा तिला आपली सून होऊ दिलं नव्हतं. नीलमचं पहिलं लग्न 2000 मध्ये ऋषी सेठियाशी झालं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. नंतर 2011 मध्ये तिने टीव्ही अभिनेता समीर सोनीशी दुसरं लग्न केलं. या दोघांना अहाना ही मुलगी आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.