गोविंदाची भाची अडकली लग्नबंधनात; पतीसोबत लिपलॉकचा फोटो व्हायरल
अभिनेता गोविंदाची भाची काश्मीरा इराणी नुकतीच लग्नबंधनात अडकली. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काश्मीरा ही प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा आहे. 'अंबर धरा' मालिकेतून ती घराघरात पोहोचली. पहा तिच्या लग्नाचे खास क्षण..
मुंबई : 17 फेब्रुवारी 2024 | यंदाचा व्हॅलेंटाइन डे अनेकांसाठी खूपच खास ठरला. यादिवशी काहींनी त्यांच्या पार्टनरसोबत नात्याची जाहीर कबुली दिली तर काहींनी साखरपुडा आणि लग्नाची घोषणा केली. यादरम्यान आता अभिनेता गोविंदाच्या भाचीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोविंदाची भाची आरती सिंहच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र आता ज्या भाचीचे फोटो समोर आले आहेत, ती दुसरीच आहे. आरती सिंहच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान गोविंदाची दुसरी भाची काश्मीरा इराणी विवाहबंधनात अडकली आहे. काश्मीराने ‘अंबर धरा’ या मालिकेत भूमिका साकारली होती. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे.
काश्मीराने 10 फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये बॉयफ्रेंड अक्षत सक्सेनाशी धूमधडाक्यात लग्न केलंय. या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काश्मीराने अत्यंत शाही अंदाजात लग्न केल्याचं या फोटोंमध्ये पहायला मिळतंय. नाकात नथ, कपाळावर बिंदी, गळ्यात मंगळसूत्र आणि लाल रंगाचा लेहंगा अशा पोशाखात ती अत्यंत सुंदर दिसतेय. एका फोटोमध्ये काश्मीरा आणि अक्षत एकमेकांना लिपलॉक करताना दिसतायत. दोघांनी हा लग्नसोहळा खूप एंजॉय केला. काही व्हिडीओमध्ये काश्मीरा आणि अक्षतचा डान्सदेखील पहायला मिळतोय.
View this post on Instagram
काश्मीरा आणि अक्षतच्या लग्नाला टीव्ही इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. ‘इश्कबाज’ फेम नकुल मेहता त्याच्या पत्नीसह या लग्नसोहळ्याला पोहोचला होता. काश्मीराने मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही काम केलंय. तिने ‘टायगर जिंदा है’, ‘रंगून’ आणि ‘भारत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. काश्मीराचा पती एअरलाइन ट्रेनिंग कॅप्टन आहे.
काश्मीरा आणि अक्षत हे गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. काश्मीरा मुंबईची आहे तर अक्षत हा दिल्लीचा आहे. याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत काश्मीरा म्हणाली होती, “माझ्या कामामुळे मला सतत मुंबईला यावंचं लागेल. त्यामुळे लग्नानंतर कुठे राहायचं, याविषयी आम्ही विचार करत आहोत. अक्षत हा माझ्या बहिणीच्या मित्राचा मित्र आहे. माझ्या बहिणीमुळेच आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. अक्षतमुळे मी अनेक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायला शिकले. त्याचा स्वभाव मला खूप आवडतो. कधीच हार मानायची नाही आणि एकनिष्ठ राहायचं, हे त्याचे गुण मला खूप आवडले.”