वीर सावरकर यांच्या आयुष्यावर येणाऱ्या सिनेमावर त्यांचे नातू रणजीत सावरकर काय बोलले?
'स्वातंत्र्य वीर सावरकर' यांच्या जीवनावर अधारलेला सिनेमा लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे.... सध्या सर्वत्र रणजीत सावरकर यांच्या प्रतिक्रियेची चर्चा रंगली आहे...
मुंबई | 18 मार्च 2024 : भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा याने सिनेमात वीर सावरकर यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. ज्यासाठी अभिनेत्री प्रचंड मेहनत केली. अभिनेत्याची मेहनत सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसली. सध्या रणदीप हुड्डा सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे.
अभिनेता सिनेमाचं प्रमोशन करत असताना वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी सिनेमावर पहिली प्रतिक्रिया देत अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. रणजीत सावरकर म्हणाले, ‘रणदीप हुड्डा याच्यासोबत माझी अनेकदा चर्चा झाली. मी अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. पण मला माहिती आहे सिनेमासाठी रणदीप हुड्डा याने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने 30 किलो वजन कमी केलं आहे.’
‘सिनेमा एक असं माध्यम आहे, ज्या माध्यमातून भारताचा इतिहास आपण नव्या पिढी पर्यंत पोहोचवू शकतो. मला आशा आहे की त्यांच्यावर आणि इतर क्रांतिकारकांवर आणखी सिनेमे बनतील.’ असं देखील वीर सावरकर यांचं नाती रणजीत सावरकर म्हणाले. सध्या सर्वत्र रणजीत सावरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा रंगली आहे.
कधी प्रदर्शित होणार ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ ?
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमा 22 मार्च रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रणदीप हुड्डा याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता अमित सियाल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी होणार असं म्हणायला हरकत नाही.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाबद्दल काय म्हणाला अभिनेता?
अभिनेता वीर सावरकर यांच्याबद्दल म्हणाला, ‘सावरकर माफी वीर नव्हते, ते वीर होते. हिंदुत्वाचे पिता आहेत… मागच्या दोन वर्षांपासून मी हा चित्रपट बनवतोय. मी अडचणींचा सामना केलाय. दोन वर्षांसाठी काळ्या पाण्याची शिक्षा मलाच झाली होती, असं वाटलं. खूप अडचणींवर मात करुन हा चित्रपट बनवलाय.’ असं अभिनेता एका मुलाखतीत म्हणाला होता.