“त्यांना माझं करिअर उद्ध्वस्त करायचं होतं, म्हणूनच..”; गुलशन ग्रोवर यांचा मोठा खुलासा

गुलशन ग्रोवर यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त भूमिका साकारल्या आणि नाव कमावलं. आता मनिष पॉलच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी इंडस्ट्रीबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

त्यांना माझं करिअर उद्ध्वस्त करायचं होतं, म्हणूनच..; गुलशन ग्रोवर यांचा मोठा खुलासा
गुलशन ग्रोवर Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 9:47 AM

मुंबई: बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते गुलशन ग्रोवर यांनी 80 च्या दशकात अभिनयक्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये ते मुख्य अभिनेत्याचा मित्र किंवा भावाच्या भूमिकेत दिसले. मात्र जेव्हा त्यांनी खलनायकाची भूमिका साकारायला सुरुवात केली, तेव्हा सर्वजण थक्क झाले. तेव्हा बॉलिवूडमध्ये प्रेम चोप्रापासून पंकज धीर, मुकेश ऋषी, आशुतोष राणा आणि रजा मुराद यांसारखे बरेच कलाकार होते, जे चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारत होते. गुलशन ग्रोवर यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त भूमिका साकारल्या आणि नाव कमावलं. आता मनिष पॉलच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी इंडस्ट्रीबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

गुलशन ग्रोवर यांनी सांगितलं की कशा पद्धतीने एका निर्मात्यांने त्यांना बोलावून चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र ती भूमिका एका अटीवर देण्यात आली होती. ती अट अशी होती की गुलशन ग्रोवर तोपर्यंत कोणत्याच इतर चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणार नाही, जोपर्यंत त्या चित्रपटाची शूटिंग पूर्ण होणार नाही.

गुलशन ग्रोवर यांनी सांगितलं की त्यांना फसवण्यासाठी आणि थांबवण्यासाठी इंडस्ट्रीतील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी हा कट रचला होता. यासाठी त्यांनी निर्मात्यांना भरपूर पैसेसुद्धा दिले होते. “या इंडस्ट्रीत माझा फक्त कोणी एक प्रतिस्पर्धी नव्हता. बरेच होते आणि त्या सर्वांनी त्या निर्मात्यांना पैसे दिले होते. मात्र त्या चित्रपटाच्या ऑफरपूर्वी मी असे बरेच चित्रपट नाकारले होते, ज्यात मला हिरोची भूमिका देण्यात आली होती”, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

हिरोच्या भूमिका त्यांनी खूप विचार केल्यानंतर नाकारल्याचं स्पष्ट केलं. त्यांना हिरोच्या भूमिकेसाठी कधी नाकारण्यात आलं नव्हतं, पण त्यांनीच तशा भूमिका साकारण्यास नकार दिला होता. गुलशन ग्रोवर यांनी सांगितलं की एका चित्रपटात कमल हासन आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या भूमिका होत्या. त्या चित्रपटातील कमल हासन यांची भूमिका आधी गुलशन यांनाच देण्यात आली होती.

“मी कोणी रिजेक्ट केलेला हिरो नाही. मात्र मी स्वत:च्या मर्जीनेच व्हिलन बनलोय. मला आयुष्यभर अभिनय करायचं होतं, म्हणूनच मी अशा भूमिका स्वीकारल्या ज्या मला फार दूरपर्यंत नेऊ शकतील. मग माझं वय, माझा लूक, माझं व्यक्तिमत्त्व कसंही असलं तरी चालेल. या प्रवासात काही आव्हानात्मक भूमिकासुद्धा मिळाल्या”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

गुलशन ग्रोवर हे लवकरच ‘इंडियन 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 2022 मध्ये त्यांनी ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ आणि ‘द गुड महाराजा’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.