होणाऱ्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नातही हंसिकाने केला डान्स; व्हिडीओ व्हायरल

सोहैलच्या पहिल्या लग्नाला हंसिकाने लावली होती हजेरी; डान्सचा व्हिडीओ आला समोर

होणाऱ्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नातही हंसिकाने केला डान्स; व्हिडीओ व्हायरल
हंसिका मोटवानी, सोहैल कठुरियाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 5:45 PM

मुंबई- बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येही आपली वेगळी निर्माण करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मुंबईचा व्यावसायिक सोहैल कथुरियाशी ती लग्नगाठ बांधणार आहे. हंसिका आणि सोहैलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच या दोघांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोहैलचं हे दुसरं लग्न आहे. विशेष म्हणजे त्याच्या पहिल्या लग्नातही हंसिकाने हजेरी लावली होती. त्याच व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हंसिकाचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मेहंदी आणि संगीत कार्यक्रम पार पडणार आहे. 4 डिसेंबर रोजी हंसिका आणि सोहैल विवाहबंधनात अडकणार आहेत. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, सोहैलचं पहिलं लग्न झालेलं आहे.

हे सुद्धा वाचा

2016 मध्ये सोहैलने रिंकी नावाच्या तरुणीशी लग्न केलं होतं. गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं होतं. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये सोहैल आणि रिंकीच्या लग्नाचे हाइलाइट्स पहायला मिळत आहेत. यामध्ये हंसिकासुद्धा दिसतेय.

सोहैलच्या पहिल्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमात हंसिकासुद्धा नाचताना पहायला मिळतेय. सध्या हंसिका आणि सोहैल हे बिझनेस पार्टनरसुद्धा आहेत. हंसिकाची इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. याच कंपनीत दोघं पार्टनर आहेत.

हंसिकाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोहैलसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले होते. यामध्ये पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरसमोर सोहैल गुडघ्यावर बसून हंसिकाला प्रपोज करताना दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

हंसिका आणि सोहैलने त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. ‘नाऊ अँड फॉरेव्हर’ असं कॅप्शन देत तिने या स्वप्नवत प्रपोजलचे फोटो पोस्ट केले आहेत.

हंसिकाचं लग्न जयपूरमधील मुंडोटा फोर्ट अँड पॅलेसमध्ये पार पडणार आहे. हंसिकाने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. ‘शका लका बुम बुम’ या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.