Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान’चा बोलबाला; ‘केजीएफ’, ‘कांतारा’लाही दिली मात

प्रशांत वर्मा दिग्दर्शित हनुमान या चित्रपटात तेजा सज्जा, वरलक्ष्मी सरतकुमार, अमृता अय्यर, विनय राय यांच्या मुख्य भूमिका आहेत. अवघ्या 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटातील व्हीएफएक्सचंही कौतुक होत आहे. मूळ तेलुगू भाषेतील या चित्रपटाला हिंदीतही उत्तम प्रतिसाद मिळतोय.

बॉक्स ऑफिसवर 'हनुमान'चा बोलबाला; 'केजीएफ', 'कांतारा'लाही दिली मात
Hanuman movieImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 8:18 AM

मुंबई : 16 जानेवारी 2024 | एकीकडे देशभरातील अनेकांना अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान’ या चित्रपटाचा बोलबाला पहायला मिळतोय. साऊथ सुपरस्टार तेजा सज्जाची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट जबरदस्त कमाई करतोय. अवघ्या 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात आतापर्यंत 54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांकडे पाहिलं तर तेलुगू आणि हिंदी व्हर्जनला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील व्हीएफएक्सचंही कौतुक होत आहे. अनेकांनी ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा उल्लेख करत ‘हनुमान’ची प्रशंसा केली आहे. ओम राऊत जे काम 150 कोटी रुपयांमध्ये करू शकला नाही ते अवघ्या 20 कोटी रुपये बजेट असलेल्या चित्रपटाने करून दाखवलं, असं नेटकरी म्हणतायत.

हनुमानची आतापर्यंतची कमाई

‘हनुमान’ हा चित्रपट मूळ तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी त्याने 4 कोटी 15 लाख रुपये कमावले होते. शुक्रवारी या चित्रपटाची कमाई दुपटीने वाढली. दुसऱ्या दिवसापर्यंत कमाईचा आकडा 8 कोटी 5 लाख रुपयांपर्यंत पोहोचला होता. शनिवारी आणि रविवारी या वीकेंडच्या दिवशीही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये ‘हनुमान’ला भरभरून प्रतिसाद दिला. शनिवारी या चित्रपटाने 12 कोटी 45 लाख रुपयांचा गल्ला जमवला होता. तर रविवारी कमाईचा आकडा 16 कोटींपर्यंत पोहोचला. वेगाने कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने रविवारी 6 कोटी रुपयांची कमाई केली. तर तमिळ व्हर्जनमधून 9 कोटी 76 रुपयांची कमाई झाली.

IMDb वर चित्रपटाला उत्तम रेटिंग

‘हनुमान’ या चित्रपटाने सोमवारी 13 कोटी 56 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. जगभरातील कमाईचा आकडा जोडल्यास या चित्रपटाची जबरदस्त कामगिरी थक्क करणारी आहे. या चित्रपटाने बजेटपेक्षा अधिक कमाई तर केलीच आहे. पण त्यादिवशी बॉक्स ऑफिसवर इतर चित्रपटांकडून टक्कर असतानाही थिएटरमध्ये त्याला अधिकाधिक पसंती मिळतेय. इतकंच नव्हे तर या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 9 रेटिंग मिळाली आहे. आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात.

हे सुद्धा वाचा

तेजा सज्जाच्या या चित्रपटाने कन्नड सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ : चाप्टर 1’ आणि ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’लाही मागे टाकलंय. केजीएफने प्रदर्शनाच्या पहिल्या सोमवारी 10.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर ‘कांतारा’ची कमाई 3.7 कोटी रुपये झाली होती. सोमवारी ‘हनुमान’ने 14.50 कोटी रुपयांची कमाई केली.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.