Adipurush | ‘आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट पोस्टर’; ‘आदिपुरुष’च्या नव्या पोस्टरवर पहिल्यांदाच कौतुकाचा वर्षाव

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास रामाच्या भूमिकेत असून अभिनेत्री क्रिती सनॉनने सीता मातेची भूमिका साकारली आहे. तर सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत आहे.

Adipurush | 'आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट पोस्टर'; 'आदिपुरुष'च्या नव्या पोस्टरवर पहिल्यांदाच कौतुकाचा वर्षाव
Adipurush new posterImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 8:57 AM

मुंबई : रामनवमीनिमित्त ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर आता निर्मात्यांनी हनुमान जयंतीचं औचित्त्य साधत बजरंग बलीचा नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता प्रभासने सोशल मीडियावर हा पोस्टर शेअर केला आहे. ‘राम के भक्त और रामकथा के प्राण- जय पवनपुत्र हनुमान,’ असं कॅप्शन देत त्यांनी रामभक्तीत लीन असलेल्या पवनपुत्र हनुमानाचा पोस्टर शेअर केला आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेनं यामध्ये हनुमानाची भूमिका साकारली आहे. आदिपुरुषच्या पोस्टरवरून आजवर बरेच वाद झाले, मात्र पहिल्यांदाच नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

या पोस्टरमध्ये हनुमान ध्यानस्थ बसलेले दिसत आहेत. त्यांच्या मागे श्रीरामाची प्रतिमा पहायला मिळत आहे. हनुमानाच्या भूमिकेतील देवदत्त नागे नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. या पोस्टरमधील इफेक्ट्ससुद्धा अनेकांना आवडले आहेत. ‘अखेर सर्वोत्कृष्ट पोस्टर आलाच,’ असं एकाने लिहिलंय. तर ‘आतापर्यंतचा हा सर्वांत चांगला पोस्टर आहे’ अशा शब्दांत दुसऱ्या युजरने कौतुक केलंय. ‘मागील प्रतिमा पाहून अंगावर शहारे आले’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास रामाच्या भूमिकेत असून अभिनेत्री क्रिती सनॉनने सीता मातेची भूमिका साकारली आहे. तर सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरवरून बरेच वाद निर्माण झाले आहेत. रामनवमीनिमित्त प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवरून निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Om Raut (@omraut)

आदिपुरुषच्या नव्या पोस्टरविरोधात मुंबई हायकोर्टाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘चित्रपट निर्मात्यांनी हिंदू धर्म ग्रंथ रामचरितमानसमधील पात्रांना योग्य पद्धतीने दाखवलं नाही. या पोस्टरने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत’, असं तक्रारीत म्हटलंय. ही तक्रार भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (अ), 298, 500, 34 अंतर्गत FIR दाखल करण्याच्या मागणीसह दाखल केली आहे.

‘आदिपुरुष हा चित्रपट हिंदू धर्मियांचा पवित्र ग्रंथ ‘रामचरितमानस’मधील मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या पवित्र ग्रंथाचं अनुसरण सनातन धर्माकडून अनेक युगांपासून होत आहे. हिंदू धर्मात रामचरितमानसमध्ये उल्लेख केलेल्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र आणि इतर पूजनीय पात्रांना विशेष महत्त्व आहे,’ असंही तक्रारीत म्हटलं गेलंय.

'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.