Arshad Warsi याचं भाग्य चमकलं बच्चन कुटुंबाच्या सूनेमुळे ; प्रचंड खडतर होता अभिनेत्याचा प्रवास

डान्सर म्हणून ‘सर्किट’ने सुरु केला आयुष्याचा प्रवास; अनेक अडचणी आल्यानंतर बच्चन कुटुंबाच्या सूनेमुळे चमकलं अभिनेत्याचं भाग्य... सध्या सर्वत्र अर्शद वारसी याचीच चर्चा

Arshad Warsi याचं भाग्य चमकलं बच्चन कुटुंबाच्या सूनेमुळे ; प्रचंड खडतर होता अभिनेत्याचा प्रवास
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 1:06 PM

मुंबई : अभिनेता अर्शद वारसी (arshad warsi) याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केलं. पण अभिनेत्याला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमातून लोकप्रियता मिळाली. सिनेमातील अभिनेत्याच्या सर्किट या भूमिकेने चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन केलं. अर्शद कायम त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिला. झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यापूर्वी अभिनेत्याने अनेक गोष्टींचा सामना केला. अभिनेत्याने डान्सर म्हणून स्वतःच्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पण करियरच्या प्रवासात अभिनेत्याला अशा काही व्यक्ती भेटल्या, ज्यांमुळे अभिनेत्याला स्वतःची ओळख निर्माण करता आली.

१९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे मेरे सपने’ सिनेमातू्न अर्शदने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रॉडक्शनमध्ये तयार झालेल्या सिनेमाने अर्शदला एक नवी ओळख मिळवून दिली. सिनेमात अर्शद शिवाय चंद्रचूण सिंह (Chandrachur Singh), प्रिया गिल (Priya Gill) आणि सिमरन (Simran) यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. पण अर्शद याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

दरम्यान, अर्शद याला कशाप्रकारे सिनेमात काम करण्याची ऑफर मिळाली, ज्यासाठी अभिनेता कायम जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा आभारी राहीला. अर्शद याने कोरियोग्राफर म्हणून बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. शिवाय अभिनेता स्टेज शो देखील करायचा. ज्यासिनेमातून अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तो सिनेमा जॉय अगस्टाइन यांनी दिग्दर्शित केला.

हे सुद्धा वाचा

जॉय अगस्टाइन आणि अर्शद यांची भेट दोन वेळा झाली होती. एकदा अर्शदच्या घरात डिनर पार्टीचं आयोजन करण्यात आलं. ज्यामध्ये अर्शदच्या एका मित्रासोबत जॉय अगस्टाइन देखील पोहोचले होते. याच दरम्यान, जॉय यांनी अर्शदला सिनेमात काम करायला आवडेल का? असा प्रश्न विचारला. त्यानंतर जॉय यांनी अर्शद याला दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं.

अर्शद कोणतीही तयारी न करता जॉय यांना भेटण्यासाठी पोहोचला. तेथे अभिनेत्याने एक शॉट दिला आणि सहज फोटोशूट केलं. एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘मला अभिनयाबद्दल काहीही माहिती नव्हतं. मी असंच फोटोशूट केलं होतं. माझे काही फोटो जया बच्चन यांना इकते आवडले, की त्या म्हणाल्या, ‘या मुलाला साइन करुन घ्या’.. जया बच्चन यांच्यामुळे माझ्या अभिनयाची सुरुवात झाली…’ अलं अभिनेता म्हणाला.

आयुष्यात येणाऱ्या चढ – उतारांचा सामना करत असताना अर्शद वार्सीच्या आई – वडिलांचं निधन झालं. अभिनत्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. त्यानंतर अर्शद एक डान्स गृपमध्ये सहभागी झाला. अनेक कार्यक्रम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये अभिनेत्याला संधी मिळाली. त्यानंतर अर्शद याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. (arshad warsi old movies)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.