Deepika Padukone Diet : काय आहे दीपिका पदुकोण हिच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या अभिनेत्रीचा डाएट चार्ट

Deepika Padukone Diet : दिवसातून सहा वेळा जेवते अभिनेत्री दीपिका पादुकोण, तरी देखील कशी इतकी फिट, काय आहे अभिनेत्रीचं फिटनेस सिक्रेट? जाणून घ्या अभिनेत्रीचा डाएट चार्ट... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिता पादुकोण हिच्या फिटनेसची चर्चा...

Deepika Padukone Diet : काय आहे दीपिका पदुकोण हिच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या अभिनेत्रीचा डाएट चार्ट
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 8:23 AM

मुंबई | 5 जानेवारी 2024 : बॉलिवूड अभिनेत्री कशा एवढ्या फिट असतात? त्या स्वतःला कसं फिट ठेवतात? त्यांचा आहार काय असतो? अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अशाच बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे तिच्याबद्दल अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. एवढंच नाही तर, दीपिका हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल देखील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण आता आपण दीपिका हिच्या डाएट आणि फिटनेसबद्दल जाणून घेऊ…

दिवसातून 6 वेळा जेवते दीपिका पादुकोण (Deepika Padukone Diet)

दीपिका पादुकोण हिला वेग-वेगळे पदार्थ खायला प्रचंड आवडतात. अभिनेत्री दिवसातून सहा वेळा जेवते, तरी देखील प्रचंड फिट आहे. त्यासाठी दीपिका स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेते. तर तुम्हाला देखील दीपिका हिच्यासारखं फिट राहायचं असेल तर, दीपिकाचा डाएट प्लॅन आणि फिटनेस रूटीन नक्की फॉलो करा…

ब्रेकफास्ट : फिटनेस फ्रीक दीपिका पदुकोण दिवसातून सहा वेळा जेवते. दिवसातून सहा वेळा अभिनेत्री थोड्या थोड्या प्रमाणात जेवते. अभिनेत्री सकाळी कोमट पाण्यात निंबू मिक्स करुन पिते. त्यानंतर अभिनेत्री 2 इडली किंवा साधा डोसा किंवा उपमासोबत 2 अंडी आणि 2 बदाम घेते. एवढंच नाही तर, अभिनेत्री एक कप दूध देखील पिते.

दुपारचं जेवण : दुपापच्या जेवणात अभिनेत्री घरी बनवलेला पदार्थांनी प्राधान्य देते. दीपिका रोज डाळ, पोळी, भाजी खाते. यासोबत ती दही देखील घेते. सर्व पदार्थ अभिनेत्री मर्यादीत प्रमाणात घेते. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी, दीपिका ताजे रस, नारळाचे पाणी किंवा स्मूदी देखील पिते.

स्नॅक्स : संध्याकाळी नाश्त्यासाठी देखील दीपिका हेल्थी डाएट घेते. बदामसोबतच अभिनेत्री इतर नट्स देखील खाते. शिवाय अभिनेत्रीला फिल्टर कॉफी देखील आवडते. रात्रीच्या जेवणात आभिनेत्री दोन पोळ्या, हिरव्या भाज्या आणि कोशिंबीर घेते, यासोबत ती फळेही खातात.

ठरलेल्या डाएटसोबत अभिनेत्रीला चॉकलेट खायला देखील प्रचंड आवडतं. शिवाय अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्यासाठी योग आणि व्यायाम देखील करते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम स्वतःचे वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर दीपिका हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.