Silsila सिनेमामूळे दिग्दर्शकाला फुटला घाम; जया आणि रेखा यांच्यात ‘टशन’, अमिताभ बच्चन हैराण !

‘सिलसिला’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि प्रेयसी आमने-सामने; सिनेमाचे दिग्दर्शक घाबरले तर, दुसरीकडे बिग बी झाले हैराण

Silsila सिनेमामूळे दिग्दर्शकाला फुटला घाम; जया आणि रेखा यांच्यात 'टशन', अमिताभ बच्चन हैराण !
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 10:43 AM

मुंबई : महानायक (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी जवळपास १० सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. तर बिग बींनी अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत ८ सिनेमांमध्ये काय केलं. पण ‘सिलसिला’ (Silsila) सिनेमात अमिताभ बच्चन यांनी प्रेयसी रेखा आणि पत्नी जया यांच्यासोबत एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये तुफान चर्चा रंगली. तेव्हा अमिताभ बच्चन आणि जया यांचं लग्न झालं होतं, तर दुसरीकडे बिग बी आणि रेखा यांच्या नात्याच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. अशात सिनेमाची देखील तुफान चर्चा रंगली. सुरुवातील सिनेमासाठी दिग्दर्शक यश चोप्रा त्रस्त होते. सिनेमात सर्व काही परफेक्ट असावं अशी यश चोप्रा यांची इच्छा होती, ज्यामुळे सिनेमाला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळेल.

यश चोप्रा यांच्यासाठी सिनेमासाठी कास्ट करणं अत्यंत कठीण होतं. सिनेमात त्यांना प्रेमाचा त्रिकूट दाखवायचा होता. त्यामुळे खऱ्या आयुष्यातील त्रिकूट यश चोप्रा यांना मोठ्या पडद्यावर आणायचं होतं. यश चोप्रा यांनी सुरुवातील सिनेमासाठी परवीन बाबी आणि स्मिता पटील यांची निवड केली होती.

पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर यश चोप्रा यांनी स्वतःचा निर्णय बदलला. एका मुलाखतीत यश चोप्रा यांनी सिनेमाच्या शुटिंग पूर्वी आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं. यश चोप्रा म्हणाले, ‘मला अमिताभ यांनी विचारलं, ‘सिनेमा आणि निवडण्यात आलेल्या भूमिकांसाठी तुम्ही आनंदी आहात का?’ यावर मी म्हणालो, ‘मला सिनेमात तुमच्यासोबत जया आणि रेखा हवे आहेत…’

हे सुद्धा वाचा

यश चोप्रा पुढे म्हणाले, ‘माझी इच्छा ऐकून अमिताभ यांनी मोठा श्वास घेतला आणि म्हणाले माझी हरकत नाही. तुम्ही जर दोन्ही अभिनेत्रींना सिनेमासाठी तयार कराल तर मला काहीही हरकत नाही. मी स्वतः प्रचंड घाबरलो होतो. कारण मला रियल आयुष्यातील प्रेमकथा मोठ्या पडद्यावर आणायची होती. मी जया आणि रेखा यांना सांगितलं होतं सेटवर कोणतीही गडबड करू नका…’

जया यांनी सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. पण जेव्हा यश चोप्रा यांनी जया यांना सिनेमाचा क्लायमेक्स सांगितला, तेव्हा जया बच्चन सिनेमा करण्यास तयार झाल्या. सिनेमात शेवटी अमिताभ बच्चन प्रेयसी रेखा यांची साथ सोडतात आणि पत्नी जया यांच्याकडे पुन्हा जातात.

रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाचे किस्से आजही चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. पण त्यांची लव्हस्टोरी कधीही पूर्ण होवू शकली नाही. आज बिग बी त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत, तर रेखा आज सर्वकाही असूनही एकट्या आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.