लहानपणी कल्कीचं लैंगिक शोषण ते लग्नाआधी मुलाचा जन्म… अभिनेत्रीच्या आयुष्यातील संघर्ष
आई-वडिलांचे वाद, लहानपणी लैंगिक शोषण, घटस्फोटानंतर चिमुरड्याला जन्म देणाऱ्या कल्कीच्या आयुष्यातील संघर्ष
मुंबई : ‘मार्गरीटा विद ए स्ट्रॉ’ फेम अभिनेत्री कल्की केक्ला हिने ‘देव डी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘ये जवानी है दीवानी’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत कलाविश्वात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं. आज अभिनेत्री स्वतःचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. झगमगत्या विश्वातून कायम स्वतःला लांब ठेवणारी कल्की अनेक कारणांमुळे चर्चेत आली. अनेक मुद्द्यांवर स्वतःचे रोखठोक मत मांडणारी अभिनेत्री कल्कीने तिच्या आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना केला.
आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक कल्की अभिनेत्री आणि लेखक आहे. कल्कीने अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. कायम आपल्या यशामुळे चर्चेत असणाऱ्या कल्कीने एक मुलाखतीत तिच्यासोबत लहानपणी झालेल्या लैंगिक शोषणाबाबत मोठा खुलासा केला.
View this post on Instagram
अभिनेत्री म्हणाली, वयाच्या ९ व्या वर्षी माझं लैंगिक शोषण झालं. पण याबद्दल कधीच कोणाला सांगितलं नाही. असं अभिनेत्री म्हणाली. धक्कादायक गोष्ट म्हणजे कल्की १५ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर कल्कीच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री आईकडे राहिली.
लग्नानंतर दोन वर्षात अभिनेत्रीचं घटस्फोट
‘देव डी’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कल्की आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप जवळ आले. तेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात पूर्ण बुडाले होते. कल्कीसोबत अनुराग यांचं दुसरं लग्न होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. पण घटस्फोटानंतरही दोघेही चांगले मित्र आहेत.
कल्की लग्नाआधी झाली आई घटस्फोट झाल्यानंतर कल्कीच्या आयुष्यात गाय हर्शबर्ग याची एन्ट्री झाली. कल्कीचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग हा इस्रायलचा असून तो आर्टिस्ट आहे. गाय हर्शबर्ग आणि कल्कीच्या रिलेशनशिपबद्दल फार कमी लोकांना माहिती होतं. अखेर ग्न न करता फेब्रुवारी 2020 मध्ये कल्कीने मुलाला जन्म दिला. कल्की मुलासोबत कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.