Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karan Johar | ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होती करण जोहरचं पहिलं प्रेम; त्याने मनातील भावना व्यक्त केल्या पण..

सर्वांना प्रेमाची व्याख्या सांगणाऱ्या करण जोहर याची 'अधुरी प्रेम कहाणी...', ज्या अभिनेत्रीवर करण करायचा प्रेम, 'ती' आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी...

Karan Johar | 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होती करण जोहरचं पहिलं प्रेम; त्याने मनातील भावना व्यक्त केल्या पण..
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 11:50 AM

मुंबई : दिग्दर्शक करण जोहर आणि बॉलिवूडच्या प्रसिद्ध लव्हस्टोरी.. हे समीकरण आज प्रत्येकाला माहिती आहे… ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी अलविदा न कहना’, ‘मोहब्बतें’ , ‘कल हो न हो…’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून करण याने प्रेक्षकांना प्रेमाची व्याख्या पटवून दिली.. आजही करणचे काही सिनेमे प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात.. करण जोहर याच्यामुळे बॉलिवूडच्या अनेक ऑनस्क्रिन जोड्या चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.. संपूर्ण जगाला प्रेम करायला शिकवणारा करण जोहरच्या आयुष्यात देखील एक मुलगी होती.. पण करणची ‘प्रेम कहाणी’ पूर्ण होवू शकली नाही… ज्या अभिनेत्रीवर करण जीवापाड प्रेम करत होता.. आज ती अभिनेत्री बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे..

आज करण जोहर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेवू… लोकांना प्रेम करायला शिकवणारा करण जोहर खऱ्या आयुष्यात मात्र एकटा आहे. सर्वकाही असूनही करण आज एकटा आयुष्य जगतोय… एक काळ असा होता जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्रीवर करणचा जीव जडला होता.. पण ‘प्रेम कहाणी’ पूर्ण होवू शकली नाही…

एका मुलाखती दरम्यान करण याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता.. करण जोहर याचं पहिलं प्रेम दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री ट्विंकल खन्ना होती… करण आणि ट्विंकल दोघांनी पंचगणी येथील बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेलतं. दोघांच्या मैत्रीचे किस्से देखील प्रसिद्ध आहेत.. शाळेतच करणला ट्विंकल आवडू लागली होती..

हे सुद्धा वाचा

ट्विंकल खन्नाच्या मिसेस फनीबोन्स या पुस्तकाच्या लाँचिंगवेळी करणने हा खुलासा केला. करणने सांगितलं होतं की, तो त्याच्या आयुष्यात फक्त एकाच महिलेच्या प्रेमात पडला होता आणि ती महिला होती ट्विंकल खन्ना. यावर ट्विंकल हिने देखील मोठा खुलासा केला होता.. अभिनेत्री म्हणाली, ‘करण माझ्यावर प्रेम करायचा.’ करण याने ट्विंकल जवळ मनातील भावना देखील व्यक्त केल्या होत्या…

करण त्याच्या मनातील भावना व्यक्त तर केल्या, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.. कारण ट्विंकलच्या मनात करण याच्याबद्दल भावना नव्हत्या. एवढंच नाही तर, करण याने ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातक टीनाच्या भूमिकेसाठी ट्विंकल हिला विचारलं होतं.. पण भूमिकेसाठी नकार दिला…

ट्विंकल देखील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.. १७ जानेवारी २००१ साली ट्विंकल हिने अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत लग्न केलं.. लग्नानंतर ट्विंकलने अभिनयाचा निरोप घेतला.. ट्विंकल आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते..

'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका.
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण...
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण....
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ.
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?.
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं.