Happy Birthday Ramesh Deo | अनेक चित्रपटांत सोबत काम, दोघांनीही आपला काळ गाजवला; रमेश देव- सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी फुलली ?

चित्रपटसृष्टीमध्ये असे काही अभिनेते असतात ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चित्रपट या एकाच गोष्टीसाठी दिलेलं असंत. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे त्यापैकीच एक आहेत. त्यांनी आपली पूर्ण हयात सिनेमा आणि अभिनयाला दिली. त्यांचा आज वाढदिवस. रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी अभिनेत्री सीम देव यांच्यासोबत लग्न केले.

Happy Birthday Ramesh Deo | अनेक चित्रपटांत सोबत काम, दोघांनीही आपला काळ गाजवला; रमेश देव- सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी फुलली ?
ramesh deo and seema deo
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 7:44 AM

मुंबई : चित्रपटसृष्टीमध्ये असे काही अभिनेते (Actor) असतात ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चित्रपट या एकाच गोष्टीसाठी दिलेलं असंत. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे त्यापैकीच एक आहेत. त्यांनी आपली पूर्ण हयात सिनेमा आणि अभिनयाला दिली. त्यांचा आज 96 वा वाढदिवस. रमेश देव  (Ramesh Deo) यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी 1962 मध्येअभिनेत्री नलिनी सराफ (सीम देव) (Seema Deo) यांच्यासोबत लग्न केले. या वर्षी रमेश देव आणि सीमा देव हे कपल आपल्या लग्नाचे 59 वर्षे पूर्ण करेल. या दोघांनीही अनेक चित्रपटांत सोबत काम केले. ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चांगली राहिलेली आहे. रमेश देव यांच्या वाढदिवसानिमित्त या जोडीचे लग्न आणि अभिनय क्षेत्रातील त्यांचे करिअर याविषयी थोडे जाणून घेऊ.

दोघांनी जगाच्या पाठीवर चित्रपटात पहिल्यांदा सोबत काम केले 

रमेश देव त्यांची पत्नी सीमा देव यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे आहेत. रमेश देव यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1950 मध्ये मराठी चित्रपटापासून केली. पुढे त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले. त्यांनी सुरुवातीला छोटे छोटे पात्र पडद्यावर साकारले. पुढे रमेश देव यांना चित्रपटात मुख्य भूमिका मिळत गेल्या. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात मुख्य भूमिका केल्या. तर हिंदी चित्रपटांत त्यांनी सहकलाकारांची भूमिका केलेली आहे. याच वेळी दुसरीकडे सिनेसृष्टीत नलिनी सराफ हे नाव नावारुपाला येत होते. त्यांनी चित्रपटांसाठी आपले नाव सीमा असे ठेवले होते. सीमा देव यांनी 1960 मध्ये जगाच्या पाठीवर या मराठी चित्रपटातून पदार्पण केले. याच चित्रपटात रमेश देव यांनीसुद्धा भूमिका साकारली होती. या जोडीमुळे जागाच्या पाठीवर चित्रपट चांगलाच गाजला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

2013 मध्ये लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला

त्यानंतर तब्बल दोन दशके रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट नंतर चांगलेच गाजले. 1962 मध्ये त्यांनी वरदक्षिणा या चित्रपटात सोबत काम केले. या चित्रपटावेळीच दोघांनाही एकमेकांवर प्रेम झाले. नंतर कशाचाही उशीर न करता त्यांनी त्याच वर्षी लग्न केलं. 2013 मध्ये या जोडीच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाले. यावेळीदेखील दोघांमधील प्रेम तेवढेच फुललेले दिसले होते. अजूनही रमेश देव आपल्या लाडक्या पत्नीसाठी नवनव्या भेटवस्तू घेतात. तसेच पत्नीला प्रेमाने त्या बेटवस्तू देत असतात. रमेश देव यांनी आतापर्यंत 280 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलेले आहे. रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ गाजवला.

इतर बातम्या :

गल्लोगल्ली चर्चा नव्या नॅशनल क्रशची! कोणंय आध्या आनंद? जाणून घ्यावच लागेल भावा!

अंकिता लोखंडे, विकी जैनचे नाते एकदम घट्ट, ‘मणिकर्णिका’ म्हणते दीपिका पादुकोण सारखे सीन करायला नवऱ्याची परवानगी ?

Video | Hritik Roshan | हृतिक डिनरला ज्या मुलीसोबत गेला, ती नेमकी होती कोण? चाहत्यांना उत्सुकता!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.