Happy Birthday Sarika | दोन्ही मुलींच्या जन्मानंतर बांधली लग्नगाठ, वाचा सारिका-कमल हसनच्या प्रेमकथेबद्दल..  

'गीत गाता चाल', 'जिद' सारख्या चित्रपटांतून सर्वांचे मन जिंकणारी अभिनेत्री सारिका (Sarika) आज (3 जून) आपला 61वा वाढदिवस साजरा करत आहे. सारिकाचा जन्म 3 जून 1960 रोजी दिल्ली येथे झाला होता. ‘हमराज’पासून सारिकाने बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

Happy Birthday Sarika | दोन्ही मुलींच्या जन्मानंतर बांधली लग्नगाठ, वाचा सारिका-कमल हसनच्या प्रेमकथेबद्दल..  
कमल हसन आणि सारिका
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 10:30 AM

मुंबई : ‘गीत गाता चाल’, ‘जिद’ सारख्या चित्रपटांतून सर्वांचे मन जिंकणारी अभिनेत्री सारिका (Sarika) आज (3 जून) आपला 61वा वाढदिवस साजरा करत आहे. सारिकाचा जन्म 3 जून 1960 रोजी दिल्ली येथे झाला होता. ‘हमराज’पासून सारिकाने बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. सारिकाने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे (Happy Birthday Sarika know about sarika and kamal haasan love story).

मात्र, सारिका तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत राहिली आहे. कमल हसन (Kamal Haasan) यांच्याबरोबरच्या तिच्या नात्यामुळे ती नेहमीच चर्चेचा भाग राहिली, पण 17 वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघे वेगळे झाले. आज सारिकाच्या वाढदिवशी आपण तिच्या आणि कमल हसनच्या प्रेमकथेविषयी जाणून घेणार आहोत.

सारिका आणि कमल हसन बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. आजही इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या लव्ह लाईफविषयी चर्चा आहे. सारिका आणि कमल 17 वर्ष एकत्र राहिल्यानंतर वेगळे झाले होते. त्यांची दुसरी मुलगी अक्षराच्या जन्मानंतर दोघांचे लग्न झाले होते.

कमल हसन आधीच विवाहित!

कमल हासन आणि सारिकाच्या नात्याची चर्चा सुरु होती, तेव्हा त्यांचे लग्न झालेले होते. कमल यांचे लग्न व्यावसायिक प्रशिक्षित नृत्यांगना वाणीशी झाले होते. कमल हसन यांची सारिकाशी जवळीक वाढताच त्यांचा वाणीशी घटस्फोट झाला. या दोघांनीही आपलं नातं कधी कुणापासून लपवलं नाही, यामुळे दोघांनाही अनेक टीकांला सामोरे जावे लागले होते (Happy Birthday Sarika know about sarika and kamal haasan love story).

निवडला लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय!

वाणीपासून घटस्फोट घेण्यापूर्वी कमल सारिकाबरोबर लिव्ह-इनमध्ये राहू लागले होते. त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सगळं काही उघड असल्यामुळे हे दोघेही बर्‍याचदा नेहमी चर्चेचा मुख्य भाग बनले. हे बॉलिवूडचे पहिले असे जोडपे होते, जे उघडपणे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जगत होते. बर्‍याच वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांची पहिली मुलगी श्रुती हसनचा जन्म झाला. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर दोघांनीही लग्न करण्याचा विचार केला. पण सारिकाला लग्नाआधीच एक मूल आणि लग्नानंतर एक मूल व्हावे असे वाटत नव्हते. म्हणून दोघांनीही लग्न करण्यापूर्वीच त्यांच्या दुसर्‍या मुलीला अक्षराला जन्म दिला होता.

मुलींच्या जन्मानंतर लग्न

श्रुती आणि अक्षरा या दोन्ही मुलींच्या जन्मानंतर कमल हासन आणि सारिकाने लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर 2004 मध्ये कमल आणि सारिका घटस्फोट घेत वेगळे झाले.

नातं तुटण्यावर कमल हसनची प्रतिक्रिया

कमल आणि सारिका यांनी एकत्र विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या घटस्फोटाविषयी ऐकून अनेक चाहत्यांची मने मोडली. सारिकापासून वेगळे झाल्यावर कमलने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘सारिका आणि मी 17 वर्षानंतर विभक्त झालो आहोत. मला माहित होते की, हे लग्न जास्त काळ टिकणार नाही. परंतु, तरीही आम्ही निराकरण ते टिकवण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हाला वाटले की, त्याचा परिणाम आमच्या मुलींवर होईल आणि म्हणून आम्ही त्या योग्य वयात येण्याची वाट पाहत होतो.’

(Happy Birthday Sarika know about sarika and kamal haasan love story)

हेही वाचा :

Must Watch Netflix Show | ‘फ्रेंड्स रियुनियन’ ते ‘ल्युसिफर’, नेटफ्लिक्सचे ‘हे’ वेब शो एकदा आवर्जून बघाच!

सोहेल खानने ओलांडल्या धर्माच्या भिंती, सीमाशी आधी मंदिरात लग्न, मग पुन्हा निकाह

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....