Harry Potter | ‘हॅरी पॉटर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मृत्यूचं कारण समोर येताच सर्वत्र खळबळ

Harry Potter | ‘हॅरी पॉटर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास... कुटुंबियांनी सांगितलं अभिनेत्याच्या निधनाचं कारण... चाहत्यांना मोठा धक्का, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना वाहिली श्रद्धांजली... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा...

Harry Potter | ‘हॅरी पॉटर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मृत्यूचं कारण समोर येताच सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 8:06 AM

मुंबई : 29 सप्टेंबर 2023 | ‘हॅरी पॉटर’ हे नाव आज प्रत्येक मुलांच्या तोंडावर आहे. ‘हॅरी पॉटर’ आणि बालपणीतील असंख्या आठवणी आज अनेकांच्या मनात असतील. ‘हॅरी पॉटर’ लहान मुलांना आवडत असल्यामुळे ‘हॅरी पॉटर’ मधील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता ‘हॅरी पॉटर’च्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. ‘हॅरी पॉटर’ मधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. म्हणून सर्वत्र खळबळ माजली आहे. अनेकांनी अभिनेत्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ‘हॅरी पॉटर’ सिमेमामध्ये ‘डंबलडोअरची’ ही भूमिका साकारणारे अभिनेते मायकेल गॅम्बॉन यांचं निधन झालं आहे. मायकेल गॅम्बॉन ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचं कारण देखील समोर आलं आहे.

न्यूमोनियामुळे मायकेल गॅम्बॉन यांचं निधन झालं असल्याची माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या निधनामुळे खळबळ माजली आहे. कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात मायकेल गॅम्बॉन यांचं निधन न्यूमोनियामुळे झालं असल्याची माहिती मिळत आहे. मायकेल गॅम्बॉन यांच्या कुटुंबियांनी सोशल मीडिया पोस्ट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सध्या कुटुंबियांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मायकेल गॅम्बॉन यांचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनाची घोषणा करताना आम्हाला दुःख होत आहे. ते एक प्रेमळ वडील आणि पती होते. त्यांचा मृत्यू न्युमोनियामुळे झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.’ असं लिहिलं आहे.

मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनामुळे हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. मायकेल गॅम्बॉन यांनी ‘हॅरी पॉटर’ सिनेमातील ८ भागांमध्ये काम केलं. मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून मायकेल गॅम्बॉन यांना श्रद्धांजली वाहत आहे. मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का बसला आहे.

फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.