Mohammed Shami : ‘शमीने लाखो रुपये खर्च केले आणि…’, पहिल्या पत्नीचे खळबळजनक आरोप

Mohammed Shami : 'लोकांनी त्याला बिचारा समजलं, पण खरं तर...' व्हिडीओ पोस्ट करत मोहम्मद शमी याच्या पहिल्या पत्नीने केले गंभीर आरोप.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्या नात्याची चर्चा...

Mohammed Shami : 'शमीने लाखो रुपये खर्च केले आणि...', पहिल्या पत्नीचे खळबळजनक आरोप
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 12:33 PM

मुंबई| 13 डिसेंबर 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. क्रिकेटपटूची पहिली पत्नी कायम त्याच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. आता देखील शमी याची पहिली पत्नी हसीन जाहाँ हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत शमी याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शमी याच्या पहिल्या पत्नीच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगलेली आहे. ‘आदर आणि सन्मान पैसे देऊन विकत घेता नाही… ‘ एवढंच नाही तर, ‘स्वतःच्या चुका लपवण्यासाठी तू लाखो रुपये खर्च केले…’ असं देखील हसीना सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाली आहे.

हसीन जहाँ हिने इन्स्टाग्रामवर एक प्रवचनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत हसीन हिने शमी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. कॅप्शनमध्ये हसीन म्हणाली, ‘शमी अहमद तुझ्यासाठी हे प्रवचन फार महत्त्वाचं आहे. लक्ष देऊन ऐक आणि कायम लक्षात ठेव…’

हे सुद्धा वाचा

‘तू स्वतःच्या चुका लपवण्यासाठी लाख – लाख रुपये खर्च केले. मीडिया माफिया हायर केले. दलाल आणि पैसे देऊ पोलिसांना विकत घेतलंस. किती लोकं तुझ्यासोबत उभी राहिली. खोटा बिचारा म्हणून तू प्रसिद्धी मिळवली आणि लोकांनी मला वाईट समजलं, माझं काय बिघडलं?’

पुढे हसिन जहाँ म्हणाली, ‘लोकांनी तुला बिचारा समजलं. तुझा काय फायदा झाला? आदर आणि सन्मान पैसे देऊन विकत घेता नाही. जे आहे तेच राहतं. तुला काहीही फायदा झाला नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हसीन जहाँ हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगत आहे. चाहते देखील हसीन हिच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचं नातं

शमी याची पत्नी हसीन जहाँ हिने पती आणि सासरच्या मंडळींवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमी याच्यासोबत हसीन हिचं दुसरं लग्न आहे. पहिल्या घटस्फोटानंतर हसीन हिने केकेआर टीममध्ये प्रवेश केला. क्रिकेटच्या मैदानावर हसीन हिने चिअर गर्ल म्हणून करियरला सुरुवात केली. 2012 मध्ये हसीन आणि शमी यांची ओळख झाली. तेव्हापासून शमी आणि हसीन यांची लव्हस्टोरी सुरु झाली. जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2014 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.