Dharmendra यांच्या नातवाच्या लग्नाला उपस्थित राहणार हेमा मालिनी? आजपर्यंत चढल्या नाही सवतीच्या घराची पायरी
सनी देओल याच्या मुलाच्या लग्नाला हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली उपस्थित राहतील? लग्नाच्या ४३ वर्षांनंतर देखील हेमा चढल्या नाही सवतीच्या घराची पायरी...
मुंबई | अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लव्हस्टोरी आणि सर्वांच्या विरोधात जावून लग्न केल्यानंतर दोघांच्या आयुष्यात आलेले चढ-उतार अनेक चाहत्यांना माहिती आहेत.. आता धर्मेंद्र यांचा नातू आणि अभिनेता सनी देओल याचा मुलगा करण देओल (Karan Deol) याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. करण १८ जून रोजी गर्लफ्रेंड द्रिशा आचार्या (Drisha Acharya) हिच्यासोबत विवाबबंधनात अडकणार आहे. सध्या करण आणि द्रिशा याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. पण करण आणि द्रिशा यांच्या लग्नात हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा आणि आहना देओल आतापर्यंतच्या कोणत्याच कार्यक्रमात दिसल्या नाही. तिघी लग्नात उपस्थित राहणार की नाही याची चर्चा सध्या जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर कधीही सवतीच्या घराची पायरी चढल्या नाहीत. त्यामुळे करण याच्या लग्नात देखील हेमा मालिनी उपस्थित राहणार नाहीत. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ असल्याच्या नात्याने सनीने ईशा आणि आहना यांना लग्नात बोलावलं आहे. काही वेळासाठी दोघी त्यांच्या पतीसोबत येतील असं सांगण्यात येत आहे..
दरम्यान, २०१२ मध्ये ईशा आणि २०१४ मध्ये आहना देओल हिचं लग्न झालं होतं. पण सनी आणि बॉबी देओल यांनी बहिणींच्या लग्नाला हजेरी लावली नव्हती. दोघींच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते..
आजपर्यंत चढल्या नाही सवतीच्या घराची पायरी
समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास ४३ वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही.
धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी १९५४ साली १९ वर्षीय प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं होतं. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुलं आहे. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजीता देओल अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.. वयाच्या २५ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर हेमा मालिनी यांच्यावर धर्मेंद्र यांचा जीव जडला. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. हेमा मालिनीसोबत लग्न झाल्यापासून प्रकाश कौर आणि त्यांच्या मुलांचे हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींसोबत कोणतंही नातं नाही.