हेमा मालिनी यांची लेक ईशाचा घटस्फोट, पतीचे अफेअर, दोन मुलींचं काय होणार? खुद्द अभिनेत्रीने सोडलं मौन

Esha Deol Divorce : हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल हिचा 11 वर्षांचा संसार मोडला, ईशा हिच्या मुलींसाठी देखील घेण्यात आलाय मोठा निर्णय, खुद्द अभिनेत्रीने सोडलं मौन... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या घटस्फोटाची चर्चा...

हेमा मालिनी यांची लेक ईशाचा घटस्फोट, पतीचे अफेअर, दोन मुलींचं काय होणार? खुद्द अभिनेत्रीने सोडलं मौन
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 8:08 AM

मुंबई | 07 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल (Isha Deol) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ईशा देओल हिचा घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशा देओल हिच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याचे दावे बऱ्याच दिवसांपासून केले जात होते. पण घटस्फोटावर खुद्द ईशा देओल हिने मोठी माहिती दिला आहे. एवढंच नाही तर, ईशा हिने मुलींसाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ईशा हिने एक स्टेटमेंट जारी केलं आहे. (Isha Deol Divorce)

ईशा देओल हिने 29 जून 2012 रोजी भरत तख्तानी याच्यासोबत लग्न केले आणि एका दशकाहून अधिक काळ लग्न झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ईशा आणि भरत यांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे. ईशा हिने दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे…’

पुढे मिळालेल्या माहितीनुसार, ‘हा निर्णय आमच्या मुलींसाठी फार महत्त्वाचा होता.’ एवढंच नाही तर, नाजूक काळात, ईशा आणि भरत यांनी गोपनीयतेचे आवाहनही केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा आणि भरत यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

ईशा- भरत यांचं लग्न…

ईशा देओल – भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 को इस्कॉन मंदिरात लग्न केलं. लग्नाच्या 5 वर्षांनंतर ईशा देओल हिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये देखील ईशा हिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. ईशा- भरत यांच्या दोन्ही मुलींची नावं राध्या आणि मिराया अशी आहेत. ईशा मुलींसोबत फोटो पोस्ट करत असते..

भरत तख्तानी याचे विवाहबाह्य संबंध…

भरत याचे परक्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा देखील दावा सोशल मीडिया युजरने केला आहे. एवढंच नाही तर, ईशा हिचा पती भरत याला न्यू इयरच्या दिवशी बेंगळुरू येथे एका पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा भरत याची गर्लफ्रेंड देखील त्याठिकाणी होती असं सांगण्यात येत आहे.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.