Dharmendra | धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीशी ईशा देओलची भेट; सनी देओलने केला पूर्ण बंदोबस्त, वाचा काय घडलं?

ईशाने तेव्हाच्या आठवणींना उजाळा दिला होता. अजीत देओल फार आजारी होते आणि त्यांच्यावर धर्मेंद्र यांच्या घरी उपचार सुरू होते. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या घरी जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यावेळी सनी देओलने ईशाची मदत केली होती.

Dharmendra | धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीशी ईशा देओलची भेट; सनी देओलने केला पूर्ण बंदोबस्त, वाचा काय घडलं?
Dharmendra familyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 1:44 PM

मुंबई : अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल नुकताच लग्नबंधनात अडकला. या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंबीयांची उपस्थिती पहायला मिळाली. मात्र अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली या लग्न समारंभापासून दूर राहिल्या. लग्नाला उपस्थित राहता आलं नसलं तरी ईशा देओलने लग्नानंतर करणला शुभेच्छा दिल्या आहेत. ईशाने सोशल मीडियाद्वारे जेव्हा करणला शुभेच्छा दिल्या, तेव्हा त्याची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा झाली. सनी देओल आणि ईशा देओल हे दोघंही जुन्या गोष्टी विसरून एकमेकांसोबत भावंडांचं खास नातं शेअर करतात. हेमा मालिनी यांचं संपूर्ण कुटुंब तसं तर धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबापासून नेहमीच वेगळं राहतं. मात्र एकदा ईशाने धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची भेट घेतली होती. याचा खुलासा खुद्द तिनेच केला होता.

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीशी ईशा देओलची भेट

‘हेमा मालिनी : बियाँड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात ईशाने खुलासा केला होता की कशा पद्धतीने प्रकाश कौर यांच्या घरी जाणारी ती हेमा मालिनी यांच्या कुटुंबातील पहिली सदस्य ठरली होती. यात असाही दावा करण्यात आला होता की हेमा मालिकनी यांच्या कुटुंबीयांना धर्मेंद्र यांच्या घरी जाण्याची परवानगी नव्हती. मात्र धर्मेंद्र यांचे भाऊ आणि अभय देओलचे वडील अजीत देओल यांच्याशी ईशाचं खास नातं होतं. त्यामुळे 2015 मध्ये जेव्हा ते आजारी पडले, तेव्हा ईशाने त्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

धर्मेंद्र यांच्या घरी सुरू होते उपचार

ईशाने तेव्हाच्या आठवणींना उजाळा दिला होता. अजीत देओल फार आजारी होते आणि त्यांच्यावर धर्मेंद्र यांच्या घरी उपचार सुरू होते. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या घरी जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यावेळी सनी देओलने ईशाची मदत केली होती. अजीत यांच्याशी भेट व्हावी म्हणून सनीने ईशासाठी सर्व बंदोबस्त केला होता. तेव्हा ईशा पहिल्यांदा प्रकाश कौर यांना भेट होती. याच पहिल्या भेटीत ईशा आणि प्रकाश कौर यांच्यात थोडीफार बातचित झाली. ईशाने त्यावेळी प्रकाश कौर यांच्या पायांना स्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेतला होता.

हे सुद्धा वाचा

काकांची भेट घेण्यासाठी सनी देओलची मदत

ईशाने पुढे सांगितलं, “मला माझ्या काकांना भेटायचं होतं. ते माझ्यावर आणि अहानावर खूप प्रेम करायचे. अभयशीही आमची फार जवळीक होती. माझ्याकडे त्यांच्या घरी जाऊन भेटण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. ते रुग्णालयात नव्हते, त्यामुळे घरी जाऊनच भेट घेता येणार होती. अशा वेळी मी सनी भैय्याला फोन केला होता आणि त्यांनी माझ्या भेटीची पूर्ण व्यवस्था केली होती.”

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....