ईशा देओल हिची घटस्फोटानंतर नव्या आयुष्याला सुरुवात, मोठी घोषणा करत म्हणाली, ‘मी आनंदी आहे कारण…’
Esha Deol | घटस्फोटानंतर वाईट दिवस विसरत ईशा देओल करणार नव्या आणि आनंदी आयुष्याची सुरुवात, मोठी घोषणा करत अभिनेत्री म्हणाली, 'मी आनंदी आहे कारण...', उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट झाल्यामुळे ईशा आहे तुफान चर्चेत...
अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ईशा देओल हिचं लग्नाच्या 11 वर्षांनंतर घटस्फोट झाल्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत होती. लग्नाआधी अनेक वर्ष उद्योजक भरत तख्तानी याला डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर ईशा हिने दोन मुलींना जन्म देखील दिला. पण भरत आणि ईशा यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर खुद्द अभिनेत्री घोषणा केली.
घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल हिची चर्चा रंगली आहे. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्रीने मोठी घोषणा केली. ईशा म्हणाली, ‘मी सध्या माझ्या आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमांची घोषणा लवकरच करण्यात येईल. मी आता खूप आनंदी आहे… सध्या एवढंच सांगेल…’ याचा अर्थ ईशा पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
View this post on Instagram
नुकताच ईशा देओल हिने वृक्षारोपण मोहीमेत हजेरी लावली होती. याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘झाडे लावणे ही एक अद्भुत भावना आहे कारण ती आपल्यासाठी नाही तर आपल्या भावी पिढ्यांसाठी आहे. नुकताच, आम्ही मुंबईत एक भयानक वादळ पाहिलं. यापूर्वी दुबईला मुसळधार पावसामुळे पुराचा सामना करावा लागला होता. हे सर्व निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी दिलेले अव्हान आहे.’
ईशा देओल हिचे सिनेमे
ईशा देओल हिने बॉलिवूडनंतर ओटीटीवर देखील पदार्पण केलं आहे. अभिनेता सुनील शेट्टी याच्यासोबत ‘हंटर टूटेगा नही तोडेगा’ या सीरिजमध्ये ईशा दिसली होती. अभिनेत्रीने 2002 मध्ये ‘कोई मेरे दिल से पूछे’ या रोमँटिक सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिच्यासोबत आफताब शिवदासानी दिसला होता. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
पहिला सिनेमा फ्लॉप ठरला असला तरी अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर ईशा देओल हिने ‘ना तुम जानो ना हम’, ‘क्या दिल ने कहा’, ‘कुछ तो है’, दस’, ‘नो एंट्री’, ‘शादी नंबर 1’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले. पण आई – वडील आणि भावंडांप्रमाणे ईशा हिला प्रसिद्धी, लोकप्रियता मिळाली नाही.