Hema Malini यांच्या दोन मुलींसोबत कसं आहे करण देओल याचं नातं? ईशाच्या एका पोस्टमुळे सर्व सत्य समोर

सनी देओल यांच्या मुलाच्या लग्नानंतर ईशा देओल हिची पहिली प्रतिक्रिया... कसे आहेत धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबातील मुलांचे संबंध? एका पोस्टमुळे सर्व सत्य समोर

Hema Malini यांच्या दोन मुलींसोबत कसं आहे करण देओल याचं नातं? ईशाच्या एका पोस्टमुळे सर्व सत्य समोर
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 11:07 AM

मुंबई | नुकताच सनी देओल यांचा मुलगा करण देओल याने नुकताच गर्लफ्रेंड द्रिशा अचार्य हिच्यासोबत लग्न केलं आहे. करण देओल याच्या लग्नानिमित्त संपूर्ण देओल कुटुंब एकत्र आलं होतं. करण देओल याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. करण देओल याच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार उपस्थित होते. अनेकांनी लग्नात येवून नव्या जोडप्याला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. पण करण आणि द्रिशा यांच्या लग्नात अभिनेते धर्मेंद्र यांचं दुसरं कुटुंब म्हणजे हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नव्हत्या..

मिळालेल्या माहितीनुसार, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर कधीही सवतीच्या घराची पायरी चढल्या नाहीत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ असल्याच्या नात्याने सनीने ईशा आणि आहना यांना लग्नात बोलावलं होतं. काही वेळासाठी दोघी त्यांच्या पतीसोबत येतील अशा चर्चा रंगल्या होत्या. पण देघीही लग्नात दिसल्या नाहीत.

पण करण आणि द्रिशा यांच्या लग्नानंतर हेमा मालिनी आणि धर्मंद्र यांची मोठी मुलगी ईशा देओल हिने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. ईशाने पोस्ट शेअर करत नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहे. ईशा इन्स्टाग्रावर स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘शुभेच्छा करण आणि द्रिशा… आयुष्यभर कायम सोबत राहा आणि दोघांच्या आनंदासाठी प्रार्थना करते…’ सध्या सर्वत्र ईशा देओल हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, ४३ वर्षांनंतर देखील धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केलेला नाही. शिवाय सनी देओल आणि हेमा मालिनी यांच्यामध्ये देखील वाद आहेत. याच कारणामुळे करण देओल याच्या लग्नात हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नव्हत्या असं समोर येत आहे..

धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी १९५४ साली १९ वर्षीय प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं होतं. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुलं आहे. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजीता देओल अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.. वयाच्या २५ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.