Hema Malini | जेव्हा पाकिस्तानी फॅनने हातात चाकू घेतला आणि…, ‘त्या’ धक्क्याने हेमा मालिनी यांच्या वडिलांचं निधन

Hema Malini | पाकिस्तानी चाहत्याने घरात घुसताच त्याने असं काय केलं? 'ती' धक्कादायक घटना पाहाताच अभिनेत्रीच्या वडिलांनी घेतला अखेरचा श्वास... 'त्या' घटनेमुळे अभिनेत्रीला बसल धक्का...

Hema Malini | जेव्हा पाकिस्तानी फॅनने हातात चाकू घेतला आणि..., 'त्या' धक्क्याने हेमा मालिनी यांच्या वडिलांचं निधन
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 12:33 PM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर आणि चाहत्यांच्या मनावर फक्त आणि फक्त अभिनेत्री हेमा मालिनी यांचं राज्य होतं. गेल्या अनेक वर्षांपासून हेमा मालिनी बॉलिवूडपासून दूर आहेत. पण त्यांच्याबद्दल अनेक चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असतात. हेमा मालिनी यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक रांगेत असायचे, तर हेमा मालिनी यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. हेमा मालिनी यांनी आपल्या खोडकर स्वभावाने, अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं. वैवाहिक आयुष्यात अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत हेमा मालिनी आनंदी होत्या.

पण हेमा मालिनी यांच्या आनंदी आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे त्या पूर्णपणे खचल्या होत्या. १९६८ मध्ये हेमा मालिनी यांची लोकप्रियता स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी घातक ठरली. जेव्हा पाकिस्तान येथील हेमा मालिनी यांचा एक चाहते बॉर्डर पार करून थेट हेमा मालिनी यांच्या घरात घुसला होता.

पाकिस्तानी चाहता हेमा मालिनी यांच्या घरात घुसल्यानंतर होत्याचं नव्हतं झालं. पाकिस्तानातून मुंबई येथे आलेल्या चाहत्याने अनेक दिवस हेमा मालिनी यांच्या घराबाहेर अभिनेत्रीची प्रतीक्षा केली. दिवस उलटत होते, महिने झाले… पण चाहता हेमा मालिनी यांना भेटू शकला नाही… अखेर त्याने हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी थेट यांच्या घरात चोरीने प्रवेश केला.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानी व्यक्ती हेमा मालिनी यांच्या घरात शिरताच नोकरांनी त्यांना चोर समजून आरडा-ओरड सुरु केली. त्यानंतर अभिनेत्याने घरात असलेला चाकू उचलला… त्यामुळे घरात उपस्थित असलेले लोक प्रचंड घाबरले.. दरम्यान, हेमा मालिनी यांचे वडील देखील काय झालं पाहायला आल्यानंतर, त्यांना देखील मोठा धक्का बसला… हेमा मालिनी यांच्या वडिलांनी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न देखील केला.

पण ‘ती’ घटना हेमा मालिनी यांचे वडील सहन करु शकले नाहीत आणि त्यांचं निधन झालं. अशात वडिलांच्या निधनाला हेमा मालिनी स्वतःला जबाबदार धरत होत्या. कुटुंबियांनी पाकिस्तानी व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पण हेमा मालिनी यांनी धक्कादायक घटनेत वडिलांना गमावलं होतं. त्यानंतर अनेक महिने हेमा मालिनी यांनी स्वतःला खोलीत बंद केलं होतं. घटनेतून सावरण्यासाठी हेमा मालिनी यांना अनेक दिवस लागले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.