धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर आजपर्यंत हेमा मालिनी चढल्या नाही सवतीच्या घराची पायरी

समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. लग्नानंतर आजही धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीच्या घराची पायरी चढल्या नाहीत हेमा मालिनी; एकदा ईशा देओल त्यांच्या घरी गेल्यानंतर...

धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर आजपर्यंत हेमा मालिनी चढल्या नाही सवतीच्या घराची पायरी
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 11:53 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे रिलेशनशिप. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या नावापुढे प्रसिद्ध अभिनेत्यांचं नाव लागलं. यामध्ये अभितेने धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमाचे किस्से आज देखील चाहत्यांमध्ये रंगतात. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाआधी दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. मोठ्या पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

मोठ्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यानंतर खऱ्या आयुष्यात देखील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यानंतर हेमा यांच्या आई-वडिलांनी लेकीवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. सेटवर देखील हेमा यांच्यासोबत वडील असायचे.

हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांचे आई – वडील त्यांच्यावर पाळत ठेवत होते. कारण धर्मेंद्र यांनी आपल्या लेकीपासून दूर राहवं अशी त्यांची इच्छा होती. जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या, तेव्हा धर्मेंद्र विवाहित होते. प्रकाश कौर यांच्यासोबत धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालं होतं आणि त्यांना चार मुलं होती.

विवाहित असताना देखील धर्मेंद्र यांच्या मनात हेमा मालिनी यांच्यासाठी खास स्थान होतं. अखेर समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.

हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास ४० वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही. 74 वर्षीय हेमा मालिनी यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये खुलासा केला की, ही परंपरा एकदा ईशा देओलने मोडली होती.

धर्मेंद्र यांनी भाऊ अजीत देओल यांची प्रकृती २०१५ साली खालावली होती. त्यांची विचारपूस करण्यासाठी ईशा आणि अहाना दोघी प्रकाश कौर यांच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा अभिनेता सनी देओल सोबत आई प्रकाश कौर यांना ईशा पहिल्यांदा भेटली होती. तेव्हा ८७ वर्षीय धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....