Hema Malini | अखेर हेमा मालिनी यांनी सांगितलं धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीला न भेटण्यामागचं कारण

करिअरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला.

Hema Malini | अखेर हेमा मालिनी यांनी सांगितलं धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीला न भेटण्यामागचं कारण
Dharmendra, Hema Malini and Prakash KaurImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 10:39 AM

मुंबई : अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलने काही दिवसांपूर्वी दृशा आचार्यशी लग्नगाठ बांधली. करणच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. करणचे आईवडील सनी आणि पूजा देओल यांच्यासह धर्मेंद्रसुद्धा त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत लग्नाला उपस्थित होते. बऱ्याच वर्षांनंतर धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर एकत्र दिसले होते. मात्र या लग्नात धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली कुठेच दिसल्या नाहीत. इशा आणि अहाना देओल यांनीसुद्धा भावाच्या लग्नाला हजेरी लावली नव्हती. या घटनेनंतर पुन्हा एकदा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं नातं चर्चेत आलं आहे.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी कधीच मोकळेपणे व्यक्त झाले नाहीत. मात्र ‘हेमा मालिनी : द ड्रीम गर्ल’ या चरित्रात त्यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीसोबतच्या नात्याविषयी लिहिलं होतं. धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्यापूर्वी बऱ्याच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रकाश कौर यांना भेटल्याचं हेमा यांनी लिहिलं होतं. मात्र लग्नानंतर दोघी पुन्हा कधीच समोर आल्या नाहीत.

हे सुद्धा वाचा

“मला कोणाच्याच आयुष्यात व्यत्यत आणायचा नव्हता. धरमजी यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे काही केलं, त्याने मी खुश होते. त्यांनी प्रत्येक वडिलाप्रमाणे आपली वडिलांची जबाबदारी पार पाडली. या गोष्टीने मीसुद्धा खुश आहे”, असंही त्यांनी चरित्रात म्हटलंय.

धर्मेंद्र यांचं पहिलं कुटुंब आणि पहिली पत्नी यांच्याबद्दल मनात खूप आदर असल्याचंही हेमा मालिनी यांनी त्यात स्पष्ट केलं. “आज मी एक नोकरदार महिला आहे आणि माझं आयुष्य कला-संस्कृतीसाठी वाहिल्याने मी माझा सन्मान राखू शकले आहे. माझ्या मते, तर परिस्थिती यापेक्षा थोडी जरी वेगळी असती, तर आज मी जे आहे ते कधीच होऊ शकले नसते. मी प्रकाश कौर यांच्याविषयी कधीच बोलले नसले तरी मला त्यांच्याविषयी खूप आदर आहे. माझ्या मुलीसुद्धा धरमजींच्या कुटुंबीयांचा आदर करतात. जगाला माझ्या आयुष्याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे, पण इतरांनी ही गोष्ट जाणून घेण्याची गरज नाही. याचा कोणाशी काहीच संबंध नाही”, असं त्यांनी म्हटलंय.

करिअरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजीता- अजीता या दोन मुली आहेत.

'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....