Ram Mandir : हेमा मालिनी जावयासोबत पोहोचल्या अयोध्येत, लेक ईशा हिची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल

Hema Malini Daughter : जावयासोबत हेमा मालिनी यांनी घेतलं प्रभू राम यांचं दर्शत... घटस्फोटामुळे चर्चेत असलेल्या ईशा देओल हिची क्रिप्टिक पोस्ट पाहून चाहते म्हणाले...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी याांच्या लेकीची चर्चा...

Ram Mandir : हेमा मालिनी जावयासोबत पोहोचल्या अयोध्येत, लेक ईशा हिची  क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 10:23 AM

Hema Malini Daughter : ड्रीम गर्ल आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी कायम त्यांच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असतात. आज हेमा मालिनी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्यातरी चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दल चर्चा रंगलेली असते. गेल्या दिवसांपासून हेमा मालिनी अयोध्या येथील प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठे दरम्यान सारद केलेल्या नाट्यनृत्यामुळे चर्चेत आहेत. एवढंच नाही तर हेमा मालिनी अयोध्या याठिकाणी जावयासोबत पोहोचल्या होत्या. हेमा मालिनी यांनी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट देखील केले आहेत.

सांगायचं झालं तर, हेमा मालिनी फक्त अभिनेत्री नाही तर, भाजप खासदार देखील आहेत. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील हेमा मालिनी सक्रिय असतात. 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात जावई वैभव वोहरा याच्यासोबत उपस्थित होत्या. जावयासोबत हेमा मालिनी यांनी फोटो देखील पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

वैभव वोहरा याच्याबद्दल सांगायचं झाले तर, हेमा मालिनी यांनी लहान मुलगी अहाना देओल हिच्या पतीचं नाव वैभव वोहरा असं आहे. इन्स्टाग्रामवर जावयासोबत फोटो पोस्ट करत हेमे मालिनी म्हणाल्या, ‘या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्याचा मान मिळाला म्हणून मी आनंदी आहे… गेल्या 500 वर्षांपासून या दिवसाची प्रतीक्षा आम्ही करत होतो…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी आणि जावई वैभव वोहरा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री ईशा देओल हिची पोस्ट

ईशा देओल हिने इन्स्टाग्रामवर स्वतःचे तीन फोटो पोस्ट केले आहेत.. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘नवं वर्ष… नवा रंग..’ असं लिहिलं आहे. अभिनेत्रीने नवी हेअर स्टाईल आणि केस कलर केल्यानंतर फोटो पोस्ट केला आहे. पण ईशाच्या सोशल मीडिया पोस्टचं कनेक्शन तिच्या घटस्फोटासोबत आहे… अशी देखील चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

ईशा- भरत यांचं लग्न…

ईशा देओल – भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 को इस्कॉन मंदिरात लग्न केलं. लग्नाच्या 5 वर्षांनंतर ईशा देओल हिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये देखील ईशा हिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. ईशा आणि भरत याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.