Esha Deol हिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चा; अभिनेत्री म्हणते, ‘जाऊ दिलं पाहिजे आणि…’

Esha Deol : ईशा देओल हिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चा, दोन मुलींच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा होणार घटस्फोट? ईशा पोस्ट 'तो' व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, 'जाऊ दिलं पाहिजे आणि...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

Esha Deol हिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चा;  अभिनेत्री म्हणते, 'जाऊ दिलं पाहिजे आणि...'
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 8:35 AM

मुंबई | 19 जानेवारी 2024 : अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा सध्या सर्वत्र तुफान रंगत आहे. ईशा हिच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. ईशा देओल लग्नाच्या 12 वर्षांनंतर पती भरत तख्तानी याच्यापासून विभक्त होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ईशा आणि भरत यांना दोन मुली देखील आहेत… घटस्फोटांच्या चर्चांवर ईशा-भरत आणि दोघांच्या कुटुंबियांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना ईशा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

ईशा हिने सोशल मीडियावर तिचा पहिला ‘कोई मेरे दिल से पूछे’ सिनेमाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सिनेमाला 22 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने सिनेमातील ‘लपक-झपक’ गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्त करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘कधी-कधी तुम्हाला जाऊ दिलं पाहिजे आणि फक्त स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवत डान्स करायला हवा…’

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

पुढे अभिनेत्री म्हणली, ‘माझा पहिला सिनेमा आणि मी 18 वर्षांची असल्याची आठवण… गेल्या गुरुवारी 11/1 रोजी माझ्या पहिल्या सिनेमाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. तेव्हा एक पोस्ट करणं राहून गेलं…हा माझा पहिला सिनेमा आहे, त्यामूळे माझ्या कायम लक्षात राहिल….’ असं ईशा हिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र ईशा आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

ईशा हिचा पहिला ‘कोई मेरे दिल से पूछे’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेत्रीसोबत, अभिनेता आफताब शिवदासानी आणि संजय कपूर देखील होते. ईशा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचं लग्न

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 मध्ये लग्न केलं. अत्यंत साध्या पद्धतील ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचं लग्न झालं. भरत एक उद्योजक आहे. भरत आणि ईशा यांना दोन मुली देखील आहेत. राध्या तख्तानी आणि मिराया तख्तानी अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत. ईशा कायम पतीसोबत देखील इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करायची.

पण गेल्या काही दिवसांपासून ईशाने पतीसोबत एकही फोटो पोस्ट केलेला नाही. एवढंच नाही तर, भरत सासूबाई हेमा मालिनी यांच्या वाढदिवसासाठी देखील आला नव्हता… शिवाय भरत याचे विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांनी देखील सर्वत्र जोर धरला आहे. पण यावर कुटुंबियांनी मौन बाळगलं आहे.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....