एकाच वेळी औषधांचे अनेक डोस, सुजला हात.. रुग्णालयातून हिना खानने पोस्ट केला फोटो

अभिनेत्री हिना खानची तब्येत बरी नसून नुकताच तिने रुग्णालयातून फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत तिने प्रकृतीबद्दलची माहिती दिली. तापामुळे हिनाला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तापामुळे अंगात त्राणच उरला नसल्याचं तिने म्हटलंय. हिनाची पोस्ट पाहताच चाहत्यांनी तिच्याविषयी काळजी व्यक्त केली आहे.

एकाच वेळी औषधांचे अनेक डोस, सुजला हात.. रुग्णालयातून हिना खानने पोस्ट केला फोटो
Hina KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 10:07 AM

मुंबई : 29 डिसेंबर 2023 | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानची तब्येत बिघडली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वत: हिनाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. हिनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये थर्मामीटरचा फोटो पोस्ट केला आहे, ज्यावर 102 तापमान दिसत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत 102-103 चा ताप असल्याची माहिती तिने या पोस्टद्वारे दिली. हिनाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली.

“माझ्यासाठी गेले तीन-चार रात्र खूप कठीण गेले. कारण मला खूप ताप आहे आणि सतत तापमान 102-103 च्या आसपासच आहे. जे लोक माझ्या आरोग्याची चिंता करत आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही काळजी करू नका. मी लवकरच बरी होऊन परतेन. माझ्यावर असंच प्रेमाचा वर्षाव करत राहा”, असं तिने लिहिलंय. यासोबतच तिने रुग्णालयातील बेडरुमवर बसल्याचा फोटो पोस्ट केला आहे. हिनाने नुकताच आणखी एक फोटो पोस्ट करत आरोग्याविषयीचे अपडेट्स दिले आहेत. यामध्ये तिच्या हातावर दोन-तीन लावलेल्या दिसत आहेत. ‘एकाच वेळी औषधांचे अनेक डोस.. हातही सुजलाय.. कोणती जागाच उरली नाही. मी थकलेय आणि वैतागलेय’, असं तिने लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

हिना खानने स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ती बिग बॉस या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. नुकताच तिचा ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’ हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला. या चित्रपटातील हिनाच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे. चित्रपट आणि मालिकांशिवाय हिनाने काही म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केलंय. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

काही दिवसांपूर्वीच हिनाने निर्माते आनंद पंडित यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित होती. यावेळी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. पार्टीत तिने पापाराझींसमोर फोटोसाठी काही पोझ दिले. हे पोझ देताना मात्र ती पापाराझींना असं काही म्हणाली, जे ऐकल्यानंतर नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. हिना खान खूप घमंडी आहे, इतका ॲटिट्यूड बरा नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं. हिना खान पार्टीला पोहोचताच पापाराझी तिचे फोटो क्लिक करू लागले होते. यादरम्यान एका पापाराझीने हिनाला पोझ देण्यास सांगितलं होतं. त्यावर तिने ज्यापद्धतीने प्रतिक्रिया दिली, ते नेटकऱ्यांना आवडलं नाही. म्हणूनच हिनाला ट्रोल केलं गेलं.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.