अवघ्या 25 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, निधनाचं धक्कादायक कारण समोर; सिनेक्षेत्रात खळबळ

अत्यंत धक्कादायक ! वयाच्या २५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास, निधनाचं धक्कादायक कारण समोर; सिनेक्षेत्रात खळबळ... अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

अवघ्या 25 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, निधनाचं धक्कादायक कारण समोर; सिनेक्षेत्रात खळबळ
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 1:19 PM

मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने वयाच्या २५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्याच्या निधनाचं धक्कादायक कारण देखील समोर आलं आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी कळताच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा सुरु आहे. सध्या ज्या अभिनेत्याच्या निधनाने सिनेक्षेत्रात खळबळ माजली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता पवन (actor pawan) आहे. पवन याने हिंदी आणि तामिळ टीव्ही विश्वातील अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं.

रिपोर्टनुसार, वयाच्या २५ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अभिनेत्याचं निधन झालं आहे. पवन याने मुंबई येथील घरात अखेरचा श्वास घेतला आहे. सिनेविश्वातील ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. शुक्रवारी अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. शुक्रवारी पहाटे पाच वाजता अभिनेत्याचं निधन झालं अशी माहिती मिळत आहे. पवन याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती.

पवन कर्नाटक येथील मांड्या याठिकाणी राहणारा आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्याचा मृतदेह मुंबई येथून मांड्या याठिकाणी नेण्यात येणार आहे. ज्याठिकाणी अभिनेत्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पवन याने वयाच्या २५ व्या वर्षी अखेरचा घेतल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार, पवन कामानिमित्त मुंबईत राहतो, तर त्याचे आई – वडील गावी असतात. चाहत्यांसोबतच कर्नाटकातील नेते आणि नातेवाईकांनी पवनच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पवन याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विशेष म्हणजे याआधी देखील हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेक सेलिब्रिटींचं निधन झालं आहे. आता पवन यांचं देखील हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे सिनेविश्वात आणि चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.