AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या ८३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता होणार चौथ्यांदा बाबा; अभिनेत्याची २९ वर्षीय गर्लफ्रेंड प्रेग्नेंट

वयाच्या ८३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता २९ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत करणार चौथ्या बाळाचं स्वागत; लवकरच अभिनेत्याच्या घरी येणार नवा पाहुणा.. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा...

वयाच्या ८३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता होणार चौथ्यांदा बाबा; अभिनेत्याची २९  वर्षीय गर्लफ्रेंड प्रेग्नेंट
| Updated on: May 31, 2023 | 11:28 AM
Share

मुंबई : अनेक हीट सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार प्रसिद्ध अभिनेता चौथ्यांदा बाबा होणार आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता चौथ्या बाळाचा बाबा होणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा आहे. अभिनेत्याची २९ वर्षीय गर्लफ्रेंड लवकरच गोंडस बाळाला जन्म देणार आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी बाबा होणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अल पॅचीनो (Al Pacino) आहेत. अल पचीनो यांची २९ वर्षीय गर्लफ्रेंड आठ महिन्यांची प्रेग्नेंट आहे. सध्या सर्वत्र पॅचीनो यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. अल पॅचीनो यांच्या २९ वर्षीय गर्लफ्रेंडचं नाव नूर अल्फल्लाह असं आहे. नूर अल्फल्लाह लवकरच एका गोंडस बाळाची आई होणार आहे.

सध्या सर्वत्र नूर अल्फल्लाह आणि पॅचीनो यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. पुढच्या महिन्यात नूर बॉयफ्रेंड अल पॅचीनो यांच्या बाळाला जन्म देणार असल्याची चर्चा रंगत आहे. अल पॅचीनो आणि २९ वर्षीय नूर गेल्या वर्षीपासून एकमेकांना डेट करत आहे. २०२२ मध्ये एप्रिल महिन्यात दोघांना डीनर दरम्यान स्पॉट करण्यात आलं होतं. ज्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. सध्या त्यांच्या नात्याच्या चर्चा तुफान व्हायरल होत आहेत.

अल पॅचीनो लवकरच चौथ्या बाळाचे बाबा होणार आहेत. याआधी अल पचीनो एक्स गर्लफ्रेंड जान टॅरंट हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना ३३ वर्षांची मुलगी देखील आहे. शिवाय अल पचीनो यांची दुसरी गर्लफ्रेंडन बेवर्ली डी’एंजेलो हिला देखील जुळी मुलं आहे. बेवर्ली डी’एंजेलो आणि अल पचीनो यांच्या जुळ्या मुलांची नावे एंटोन आणि ओलिविया अशी आहेत..

बेवर्ली डी’एंजेलो आणि अल पॅचीनो १९९७ ते २००३ इतकी वर्ष एकत्र होते. महत्त्वाचं म्हणजे, चित्रपट निर्माती नूर अलफल्लाह हिच्यापूर्वी पॅचीनो यांनी दिग्गज गायक मिक जेगर आणि निकोलस बर्ग्रेन यांना देखील डेट केलं आहे.. सध्या सर्वत्र अल पॅचीनो यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.

अल पचीनो यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘द गॉडफादर’ सीरिजचे स्टार अल पॅचीनो यांनी ‘स्कारफेस’, ‘सेंट ऑफ ए वुमन’, ‘हीट’, ‘सर्पिको’, ‘सी ऑफ लव’, ‘द डेविल्स एडवोकेट’, ‘द इनसाइडर’, ‘एन्ड जस्टिस फॉर ऑल’, ‘कार्लिटोज वे’, ‘डॉनी ब्रास्को’, ‘ओशन्स थर्टीन’ यांसारख्या अनेक सुपरहीट सिनेमांमध्ये काम केलं आहे.

शिवाय काही वर्षांपूर्वी अल पॅचीनो यांनी ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलीवुड’, ‘द आयरिशमैन’, ‘हाउस ऑफ गुच्ची’, ‘द पाइरेट्स ऑफ सोमालिया’, ‘डैनी कॉलिन्स’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता वयाच्या ८३ वर्षी अल पॅचीनो चौथ्यांदा बाबा होणार असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.