रेखा यांना मगरीच्या तोंडात ढकलून हॉलिवूड अभिनेता फरार; म्हणाला, ‘आनंदी होतो कारण… ‘

Rekha: रेखा यांना मगरीच्या तोंडात ढकलणारा अभिनेता कोण? अभिनेत्री मगरीच्या तोंडात ढकल्यानंतर म्हणाला, 'आनंदी होतो कारण... ', रेखा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

रेखा यांना मगरीच्या तोंडात ढकलून हॉलिवूड अभिनेता फरार; म्हणाला, 'आनंदी होतो कारण... '
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 2:45 PM

Rekha: अभिनेत्री रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण रेखा फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिल्या. आज देखील रेखा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना रेखा यांनी अनेक थाटनीच्या भूमिका साकारल्या. ज्यामुळे आजही सिनेमातील सीन आणि काही किस्से समोर येत असतात.

रेखा यांनी ‘खून भरी मांग’ सिनेमात देखील दमदार भूमिका साकारली होती. ‘खून भरी मांग’ सिनेमा आजही अनेकांना आठवत असेल. सिनेमात रेखा यांच्यासोबत अभिनेते कबीर बेदी यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. दरम्यान, सिनेमातील एक सीन तुफान चर्चेत आला.

सिनेमातील एक सीनमध्ये रेखा यांच्यापासून सूटका मिळवण्यासाठी कबीर बेदी अभिनेत्रीला मगरीच्या तोंडात ढकलतात. तो सीन आजही चाहत्यांना आठवत असेल. याच सीनबद्दल एका मुलाखतीत कबीर बेदी यांना विचरण्यात आलं होतं. रेखा यांना मगरीच्या तोंडात का ढकललं? असा प्रश्न कबीर यांना विचारण्यात आला.

हे सुद्धा वाचा

यावर कबीर बेदी म्हणाले, ‘त्या वेळी मी अमेरिकेत काम करत होतो. फोन आला आणि कबीर राकेश रोशन बोलत आहे… असा आवाज आला. रोशन म्हणाले, मी सिनेमा बनवत आहे आणि हिरो म्हणून तुला कास्ट करण्याचा विचार करत आहे. सिनेमात जो हिरो आहे तोच खलनायक होतो… ही भूमिका मी कोणत्या अभिनेत्याला दिली तर, त्याच्याकडून मला नकारच मिळणार आहे..’

‘भूमिका कोणत्या खलनायकाला दिली तर, तो आनंदी होईल.. पण तुच एक आहेस जो सिनेमात हिरो देखील होऊ शकतो आणि अभिनेता देखील… तेव्हा मी राकेश यांना विचारलं सिनेमात अभिनेत्री कोण आहे? त्यांनी रेखा यांचं नाव घेताच मी आनंदी झालो आणि क्षणाचाही विलंब न करता होकार दिला…’

पुढे कबीर बेदी म्हणाले, ‘सिनेमात काम करण्यासाठी अनेरिकेतून भारतात आलो. रेखा यांना मगरीच्या तोंडात ढकललं आणि पुन्हा हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी गेलो… सिनेमात काम करुन मला प्रचंड आनंद झाला…’ असं देखील कबीर बेदी म्हणाले होते.

‘खून भरी मांग’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 1988 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. सिनेमामुळे रेखा आणि कबीर बेदी यांच्या बॉलिवूड करियरला देखील नवी दिशा मिळाली. तेव्हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 6 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.