लग्नाच्या 12 वर्षांनंतर मोडलं लग्न, नवऱ्याने साथ सोडल्यानंतर दोन मुलींचा सांभाळ कशी करते ईशा?
'कधी कधी फक्त मुलांसाठी सर्वकाही विसरुन...', नवऱ्याने साथ सोडल्यानंतर दोन मुलींचा सांभाळ कशी करतेय ईशा देओल? केलाय मोठा खुलासा, घटस्फोटानंतर दोन्ही मुलींचा 'सिंगर मरद' म्हणून अभिनेत्री करतेय सांभाळ

अभिनेत्री ईशा देओल हिने अनेक वर्ष उद्योजक भरत तख्तानी याला डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2024 मध्ये ईशा आणि भरत यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. लग्नाच्या 12 वर्षांनंतर ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर ईशा दोन मुलींचा सांभाळ ‘सिंगर मदर’ म्हणून करत आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत ईशाने मुली आणि घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल हिची चर्चा रंगली आहे.
घटस्फोटानंतर मुलींचा कस्टडी ईशा देओल हिच्याकडे आहे. पण ईशा आणि भरत दोघे मिळून आई – वडिलांची जबाबदारी पार पाडत आहेत. नुकताच झालेल्या मुलाखतीत ईशा हिला, ‘घटस्फोटानंतर मुलींचा सांभाळ कशी करते?’ असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर ईशा देओल म्हणाली, ‘दुर्दैव आहे… कधी कधी नाती संपून जातात पण जेव्हा यामध्ये मुलं असतात, तेव्हा स्वतःमधील अहंकार विसरावा लागतो आणि हे अत्यंत गरजेचं आहे. अखेर आम्ही दोन गोंडस मुलींचे आई – बाबा आहोत. काहीही झालं तरी, आम्ही प्राधान्य आमच्या दोन मुलींनाच देतो… जेव्हा एक जण मुलांसाठी योग्य निर्णय घेतो, तेव्हा दुसरा देखील त्यामध्ये सामिल असतो… असं देखील ईशा म्हणाली.
View this post on Instagram
घटस्फोटाचा मुलींवर वाईट परिणाम व्हायला नको… यासाठी ईशा पूर्ण प्रयत्न करत असते. सांगायचं झालं तर, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलही ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ईशा देओल हिने 29 जून 2012 रोजी भरत तख्तानी याच्यासोबत लग्न केले आणि एका दशकाहून अधिक काळ लग्न झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
घटस्फोटानंतर ईशा देओल हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अभिनेत्री तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘तुमको मेरी कसम’ सिनेमातून ईशा पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. सिनेमा 21 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.