Deepika Padukone: दीपिका-रणवीरच्या लग्नात किती झाला होता खर्च? बजेट ऐकून विस्फारतील डोळे!

बॉलिवूडमधल्या सर्वांत महागड्या लग्नांपैकी एक.. दीपिका पदुकोण-रणवीर सिंगच्या लग्नाचा खर्च माहितीये का?

Deepika Padukone: दीपिका-रणवीरच्या लग्नात किती झाला होता खर्च? बजेट ऐकून विस्फारतील डोळे!
Deepika Padukone: दीपिका-रणवीरच्या लग्नात किती झाला होता खर्च? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 10:06 AM

मुंबई: अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची लव्ह-स्टोरी जगजाहीर आहे. ‘रामलीला’ या चित्रपटात काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दीपिका-रणवीरचं लग्न हा इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेचा विषय होता. 14 नोव्हेंबर 2018 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. या शाही लग्नाचा खर्च किती झाला असेल, हे तुम्हाला माहीत आहे का? या लग्नाच्या खर्चाचा आकडा ऐकून तुमचे डोळे विस्फारतील!

रिपोर्ट्सनुसार, दीपिका-रणवीरचं लग्न हे बॉलिवूडमधल्या महागड्या लग्नांपैकी एक आहे. इटलीत हे डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं होतं. इटलीतील लेक कोमो इथल्या विला डेल बालबियानो (Villa Del Balbianello) याठिकाणी रणवीर-दीपिकाचं लग्न पार पडलं. हा विला अत्यंत आलिशान आहे.

हे सुद्धा वाचा

एका रात्रीचा इतका खर्च

26000 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या रिसॉर्टमध्ये 75 खोल्या आहेत. या सर्व खोल्या दीपिका-रणवीरच्या पाहुण्यांसाठी बुक करण्यात आल्या होत्या. त्यावेळी एका रुमची किंमत एका रात्रीसाठी जवळपास 33 हजार रुपये इतकी होती. या हिशोबाने सर्व 75 रुम्सचा एका रात्रीचा खर्च 24 लाख 75 हजार रुपये इतका होतो. दीपिका-रणवीरने हा विला एका आठवड्यासाठी बुक केला होता. ज्याचा संपूर्ण खर्च 73 लाख रुपयांहून अधिक होता.

संपूर्ण लग्नाचा खर्च

रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या वेडिंग आऊटफिटवरही कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाच्या फक्त मंगळसूत्राची किंमत 20 लाख रुपये होती. हे मंगळसूत्र डायमंडचं होतं. दीपिका-रणवीरचं लग्न शाही पद्धतीने पार पडलं होतं. संपूर्ण लग्नाचा खर्च हा जवळपास 95 कोटी रुपये इतका झाला होता, असं म्हटलं जातं.

रणवीर-दीपिकाच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. आज (गुरुवार) दीपिका तिचा 37 वा वाढदिवस साजरा करतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रणवीरच्या ‘सर्कस’ या चित्रपटातील एका गाण्यात दीपिका झळकली होती. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.