घटस्फोटानंतर या कारणांमुळे सबाच्या प्रेमात पडला हृतिक रोशन ; कशी आहे दोघांची लव्हस्टोरी
सबा आणि हृतिक यांच्या फक्त रिलेशनशिपच नाही तर, लग्नाच्या चर्चा देखील तुफान रंगत असतात. सबा आणि हृतिक यांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
मुंबई : अभिनेता हृतिक रोशन कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. हृतिक याने २०० साली प्रदर्शित झालेल्या ‘कहो ना प्यार हैं’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या अभिनेता गर्लफ्रेंड सबा आझाद हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. नुकताच हृतिक गर्लफ्रेंड सबा हिच्यासोबत सुनैना रोशनच्या वाढदिवसाला पोहोचला होता. सबा आता रोशन कुटुंबातील महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान दिसते. गेल्या अनेक दिवसांपासून सबा आणि हृतिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.
सबा आणि हृतिक यांच्या फक्त रिलेशनशिपच्याच नाही तर, लग्नाच्या चर्चा देखील तुफान रंगत असतात. सबा आणि हृतिक यांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ट्विटरवरुन झाली. मिळालेल्या माहितीनुसार सबा आणि हृतिक यांची मैत्री ट्विटरवरुन झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
हृतिकला सबा हिचा एक व्हिडीओ प्रचंड आवडला होता आणि तो व्हिडीओ अभिनेत्याने ट्विटरवर शेअर देखील केला होता. व्हिडीओमध्ये सबा एका अंतरराष्ट्रीय रॅपरसोबत गात होती. सबाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हृतिकने सबाला मेसेज केला होता. त्यानंतर दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली. आता दोघांच्या नात्याच्या चर्चा कायम रंगत असतात.
सबा आणि हृतिक यांच्या नात्याचं सत्य २० फेब्रुवारी २०२१ मध्ये समोर आलं. दोघे कायम एकमेकांसोबत वेळ व्यतीत करताना दिसतात. एवढंच नाही तर, दोघांच्या सोशल मीडियावर देखील एकमेकांसोबत फोटो आहे. त्यांच्या फोटोंची चर्चा देखील कायम रंगलेली असते. दरम्यान २२ जानेवारी रोजी हृतिकची बहीण सुनैना रोशनच्या वाढदिवसानिमित्त सबा अभिनेत्याच्या घरी गेली होती.
सुनैनाच्या वाढदिवसाचा फोटो अभिनेत्याची आई पिंकी रोशन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. सध्या सर्वत्र सबा आणि हृतिकच्या कुटुंबाचा फोटो व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, दोघांना अनेकदा डेटला जाताना देखील स्पॉट करण्यात आलं आहे.
सुझानसोबत हृतिकचं घटस्फोट अभिनेता हृतिक रोशन याने २००० मध्ये सुझान हिच्यासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं देखील आहेत. पण लग्नाच्या १३ वर्षांनंतर दोघे हृतिक आणि सुझान विभक्त झाले. २०१३ मध्ये हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट झाला. पण दोघांचे मार्ग मोकळे झाले असले तरी मुलांसाठी हृतिक आणि सुझान एकत्र येतात.