Amitabh Bachchcan यांच्या बाजूला असलेला चिमुकला आजचा सुपरस्टार; घटस्फोटानंतर करतोय १२ वर्ष लहान मुलीला डेट

अमिताभ बच्चन यांच्या बाजूला बसलेल्या चिमुकल्याला ओळखणं कठीण; घटस्फोटानंतर १२ वर्ष लहान मुलीसोबत अडकणार विवाहबंधनात, कोण आहे 'तो'?

Amitabh Bachchcan यांच्या बाजूला असलेला चिमुकला आजचा सुपरस्टार; घटस्फोटानंतर करतोय १२ वर्ष लहान मुलीला डेट
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 11:35 AM

मुंबई : लहानपणाचे फोटो पाहिल्यानंतर सर्वांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात आणि सेलिब्रिटींच्या लहानपणीचे फोटो समोर आले की त्यांना ओळखणं देखील कठीण होतं… आता देखील एका अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणारा चिमुकला आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये आज एक वेगळी ओळख आहे. त्याची स्टाईल, ड्रेसिंग सेन्स, घायाळ करणाऱ्या त्याच्या अंदाजावर आज असंख्य मुली फिदा असतात. अभिनेता त्याच्या डान्समुळे देखील कायम चर्चेत असतो. अभिनेत्याचं इतकं कौतुक केल्यानंतर कदाचित तुम्ही चिमुकल्याला ओळखलं असेल… या अभिनेत्याने बॉलिवूडला अनेक सुपरहीट सिनेमे दिले. महानायक अभिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार चिमुकला आज त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो.

फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हृतिक रोशन आहे. हृतिक हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. हृतिक याने ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘धूम २’, ‘वॉर’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं… हृतिक फक्त त्याच्या अभिनयामुळे नाही तर, फिटनेसमुळे देखील चर्चेत असतो.

हे सुद्धा वाचा

वयाच्या ४९ व्या वर्षी देखील हृतिक प्रचंड हँडसम दिसतो.. हृतिक रोशन हा स्टारकिड असल्यामुळे त्याचं लहानपण अनेक सेलिब्रिटींसोबत गेलं. हृतिक रोशन याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता घटस्फोटानंतर १२ वर्ष लहान मुलीला डेट करत आहे.. हृतिक रोशन याच्या गर्लफ्रेंडचं नाव सबा आझाद असं आहे…

हृतिक याचं पहिलं लग्न सुझान खान हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.. लग्नाच्या १४ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर हृतिक, सबा आझाद हिला डेट करत आहे, तर दुसरीकडे हृतिकची पहिली पत्नी अभिनेता आणि मॉडेल अर्सनाल गोनी याला डेट करत आहे. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

हृतिक याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘क्रिश ४’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. नुकताच, हृतिक आणि अभिनेता सैफ अली खान याचा ‘विक्रम वेधा’ सिनेमा चाहत्यांच्या भेटीस आला. चाहते देखील हृतिक रोशन याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.