Hrithik Roshan: गर्लफ्रेंडला सोडून पहिल्या पत्नीसोबत हृतिक निघाला ‘या’ठिकाणी, फोटो व्हायरल
पहिल्या पत्नीसोबत पुन्हा दिसला हृतिक रोशन... घटस्फोटानंतर दोघांचा 'असा' फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण... सध्या सर्वत्र हृतिक रोशन आणि सुझान खान यांची चर्चा...
मुंबई : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. पहिली पत्नी सुझान खान हिच्यापासूव विभक्त झाल्यानतंर अभिनेता सबा आझाद हिला डेट करत. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर, दोघे एकमेकांसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण आता हृतिक याच्यासोबत सबा नाहीतर अभिनेत्याची पहिली पत्नी सुझान दिसली. नुकताच अभिनेत्याला सुझान खान आणि तिच्या कुटुंबासोबत स्पॉट करण्यात आलं. सध्या सर्वत्र हृतिक आणि सुझान यांची चर्चा रंगत आहे. शिवाय दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.
हृतिक आणि सुझान यांनी २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. दोघांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. पण घटस्फोटानंतर दोघांच्या आयु्ष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. हृतिक याचं नाव सबा आझाद हिच्यासोबत जोडण्यात आलं तर, सुझान हिला देखील अभिनेता आणि मॉडेल अर्सनाल गोनी याच्यासोबत अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं.
पण आता हृतिक आणि सुझान यांना पन्हा एका ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे. सांगायचं झालं तर, शनिवारी रोशन कुटुंबाने डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, पार्टीच्या निमित्ताने सुझान भाऊ जयाद याच्यासोबत पोहचली होती. त्यांच्यासोबत अर्सनाल गोनी देखील होती. महत्त्वाचं म्हणजे, पार्टीमध्ये अर्सनाल आणि सुझान यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
घटस्फोटानंतर हृतिक आणि सुझान यांच्या आयुष्यात पुन्हा नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. घटस्फोटानंतर हृतिक सबा आजाद हिला डेट करत आहे, तर दुसरीकडे सुझान अभिनेता अर्सनाल गोनी (Arslan Goni) याला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. (Sussanne Khan dating Arslan Goni)
महत्त्वाचं म्हणजे सुझान खान, अर्सनाल गोनी, सबा आझाद आणि हृतिक रोशन यांना देखील अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. हृतिक कायम सोशल मीडियावर सबा हिच्यासोबत फोटो शेअर करत असतो. सबा आण हृतिक यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ट्विटरच्या माध्यमातून झाली. आता दोघे लग्नबंधनात कधी अडकतील अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.