IIFA 2023 | आयफा पुरस्कार सोहळ्यात ‘या’ सेलिब्रिटींनी मारली बाजी; हृतिक, आर. माधवनची विशेष कामगिरी
IIFA Rocks कार्यक्रमात गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाने तीन पुरस्कार पटकावले. तर भुलभुलैय्या 2 ने दोन पुरस्कार आपल्या नावे केले. विक्रम वेधा, ब्रह्मास्त्र, मोनिका ओह माय डार्लिंग आणि दृश्यम 2 यांनी प्रत्येकी एक ट्रॉफी जिंकली.
मुंबई : इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स सोहळा (IIFA Awards) नुकताच अबु धाबीमध्ये पार पडला. 27 मे रोजी संध्याकाळी हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला सलमान खान, कमल हासन, विकी कौशल, नोरा फतेही, अभिषेक बच्चन, आर. माधवन, सारा अली खान, ए. आर. रेहमान, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, अनिल कपूर, मॉनी रॉय, दिया मिर्झा, मनिष मल्होत्रा आणि इतरही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात अजय देवगण, तब्बू आणि अक्षय खन्ना यांच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर आर. माधवनने ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. विक्रम वेधा आणि गंगुबाई काठियावाडी या चित्रपटांसाठी हृतिक रोशन आणि आलिया भट्टने सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्या नावे केला.
पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट- दृश्यम 2 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आर. माधवन (रॉकेट्री : द नंबी इफेक्ट) मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स (पुरुष)- हृतिक रोशन (विक्रम वेधा) मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स (स्त्री)- आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी) सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका (पुरुष)- अनिल कपूर (जुग जुग जियो) सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका (स्त्री)- मौनी रॉय (ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा) सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) – शांतनू माहेश्वरी (गंगुबाई काठियावाडी) आणि बाबिल खान (कला) सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री)- खुशाली कुमार (धोका : राऊंड द कॉर्नर) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (केसरियाँ, ब्रह्मास्त्र) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- श्रेया घोषाल (रसिया, ब्रह्मास्त्र) सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम चक्रवर्ती (ब्रह्मास्त्र) सर्वोत्कृष्ट गीत- अमिताभ भट्टाचार्य (ब्रह्मास्त्र) सर्वोत्कृष्ट मूळ कथा- जसमीत के रीन आणि परवीझ शेख (डार्लिंग्स) सर्वोत्कृष्ट कथा (अडाप्टेड)- आमिल कियान खान आणि अभिषेक पाठक (दृश्यम 2) प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी- रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा (वेड) भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी- कमल हासन चित्रपटातील फॅशनसाठी उत्कृष्ट कामगिरी- मनिष मल्होत्रा
IIFA Rocks कार्यक्रमात गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाने तीन पुरस्कार पटकावले. तर भुलभुलैय्या 2 ने दोन पुरस्कार आपल्या नावे केले. विक्रम वेधा, ब्रह्मास्त्र, मोनिका ओह माय डार्लिंग आणि दृश्यम 2 यांनी प्रत्येकी एक ट्रॉफी जिंकली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन विकी कौशल आणि अभिषेक बच्चन यांनी केलं. तर फराह खान आणि राजकुमार राव यांनी IIFA Rocks कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.