बॉलिवूडवर भडकली प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी; म्हणाली “आईला नेहमीच वेश्या किंवा नोकर..”

ओटीटीमुळे ईला अरुण यांना दमदार भूमिका साकारायला मिळाल्याची माहिती इशिताने दिली. "आता तिला चांगल्या भूमिका मिळत आहेत. ती एकानंतर एक चित्रपट करत आहे. तिच्या प्रतिभेला ओळखा आणि त्याप्रमाणे तिला काम द्या", असं आवाहन इशिताने आईसाठी केलं आहे.

बॉलिवूडवर भडकली प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी; म्हणाली आईला नेहमीच वेश्या किंवा नोकर..
Ila Arun's Daughter IshittaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 8:30 AM

मुंबई : अभिनेत्री ईला अरुण या त्यांच्या दमदार अभिनयकौशल्यासाठी आणि लोकप्रिय लोकगीतांसाठी ओळखल्या जातात. मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. लम्हें, जोधा अकबर, बेगम जान, शादी के साइड इफेक्ट्स यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. ईला अरुण यांच्या हाती आताही अनेक भूमिकांचे ऑफर्स आहेत. लवकरच त्या ‘आर्या’ या वेब सीरिजच्या तिसऱ्या सिझनमध्ये झळकणार आहेत. ईला यांची मुलगी इशिता अरुणसुद्धा आईच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनेत्री झाली. अभिनेत्रीसोबतच ती व्हीजे, डान्सर, गीतकार आणि इंटेरिअर डिझायनरसुद्धा आहे. इशिता सध्या तिच्या ‘स्कूप’ या वेब सीरिजमध्ये चर्चेत आली आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आईला मिळणाऱ्या भूमिकांविषयी खंत व्यक्त केली.

“आईने सतत वेश्या, नोकर किंवा विणकराच्या भूमिका साकारल्या”

बॉलिवूड इंडस्ट्रीने आईला तिची पूर्ण क्षमता दाखवण्याची संधी दिली नाही, अशा शब्दांत तिने नाराजी बोलून दाखवली. “माझ्या आईला आता अशा भूमिका मिळत आहेत, ज्यामधून ती तिचं अभिनयकौशल्य सिद्ध करू शकते. ती उत्तम लेखिका आहे आणि हिंदी, उर्दू यांसारख्या भाषांवर तिचं प्रभुत्व आहे. तिच्यामुळेच माझीही भाषा सुधारली आहे. तिच्या अभिनयाची सुरुवात श्याम (बेनेगल) काकांपासून झाली. ते सर्वांचे प्रिय आहेत आणि मी नेहमी मस्करी करते की आईने सतत वेश्या, नोकर किंवा विणकराच्या भूमिका साकारल्या आहेत”, असं ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

“अभिनयकौशल्यापेक्षा दिसण्यावरून तुलना झाली”

ईला अरुण यांना त्यांच्या दिसण्यामुळे बहुतांश भूमिका नाकारल्या गेल्या, असंही इशिताने सांगितलं. “याच कारणामुळे त्यांच्या वाट्याला फार मोजक्या भूमिका आल्या. 80 आणि 90 च्या दशकात तिने लोकगीतांवर भर दिला आणि कोणत्याही लॉबीचा भाग होणं टाळलं होतं. सावळी, लांब केस आणि तिच्या वयाच्या बऱ्याच सुंदर अभिनेत्री त्यावेळी होत्या, म्हणून तिला ऑफर्स मिळत नव्हते”, असं ती पुढे म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Ishitta Arun (@ishitta.arun)

आईसाठी लेकीचं आवाहन

ओटीटीमुळे ईला अरुण यांना दमदार भूमिका साकारायला मिळाल्याची माहिती इशिताने दिली. “आता तिला चांगल्या भूमिका मिळत आहेत. ती एकानंतर एक चित्रपट करत आहे. तिच्या प्रतिभेला ओळखा आणि त्याप्रमाणे तिला काम द्या”, असं आवाहन इशिताने आईसाठी केलं आहे. ईला अरुण यांची मुलगी इशिताने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी एका जाहिरातीत काम केलं होतं. 1982 मध्ये विक्स वेपोरबच्या जाहिरातीत ती झळकली होती. त्यानंतर तिने काही माहितीपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. सध्या तिच्या स्कूप या सीरिजची जोरदार चर्चा आहे. यामध्ये तिने करिश्मा तन्ना आणि हरमन बवेजासोबत स्क्रीन शेअर केला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.