Ileana D’cruz |इलियानाला चाहत्याने व्हर्जिनिटीबद्दल विचारलेला प्रश्न; सडेतोड उत्तर देत अभिनेत्रीने तोडं केलं बंद

गेल्या काही दिवसांपासून इलियाना ही अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊो सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची चर्चा होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासोबत हे दोघं पार्टी करतानाही दिसले होते.

Ileana D'cruz |इलियानाला चाहत्याने व्हर्जिनिटीबद्दल विचारलेला प्रश्न; सडेतोड उत्तर देत अभिनेत्रीने तोडं केलं बंद
Ileana D'cruzImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 8:29 AM

मुंबई : अभिनेत्री इलियाना डिक्रूझने नुकतीच चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत इलियानाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र त्याचसोबत इलियानाचा पती आणि बाळाचा होणारा पिता कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रेग्नंसीच्या या चर्चांदरम्यान आता इलियानाने एका चाहत्याला दिलेल्या सडेतोड उत्तराची चर्चा होत आहे. एका चाहत्याने इलियानाला सोशल मीडियावर तिच्या व्हर्जिनिटीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर तिने बेधडक उत्तर देत ट्रोलरचं तोंड बंद केलं होतं.

2019 मध्ये इलियानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनअंतर्गत चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली होती. मात्र या प्रश्नोत्तरांदरम्यान एका चाहत्याने इलियानाला असा प्रश्न विचारला, जो वाचून तिच्या रागाचा पारा चढला. ‘तू तुझी व्हर्जिनिटी कधी गमावलीस’, असा प्रश्न एका युजरने तिला विचारला होता. युजरच्या या प्रश्नाचं उत्तर देताना इलियानाने लिहिलं, ‘वाह, नोसी (इतरांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याची सवय असणारे) तुझी आई यावर काय म्हणेल?’

हे सुद्धा वाचा

इलियानाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत गरोदर असल्याचं नुकतंच जाहीर केलं. लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘.. आणि प्रवासाला सुरुवात’ असा मजकूर त्या ड्रेसवर लिहिण्यात आला आहे. तर आणखी एका फोटोमध्ये इलियानाच्या गळ्यात एक पेंडंट पहायला मिळतंय. ‘मम्मा’ अशा अक्षरांचा तो पेंडंट आहे. हे दोन्ही फोटो पोस्ट करत इलियानाने कॅप्शनमध्ये ‘लवकरच..’ असं लिहिलं आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून इलियाना ही अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊो सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची चर्चा होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासोबत हे दोघं पार्टी करतानाही दिसले होते. इलियाना बरीच वर्षे अँड्र्यू नीबोन या ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरला डेट करत होती. हे दोघं लग्न करणार अशीही चर्चा होती. मात्र 2019 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर इलियानाचं नाव कतरिनाच्या भावाशी जोडलं गेलं. मात्र या दोघांनी सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर कधीच त्याची कबुली दिली नाही.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....