Ileana D’Cruz | अखेर इलियानाने पोस्ट केला मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो; कोण आहे होणाऱ्या बाळाचा पिता?

इलियाना सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र खासगी आयुष्यामुळे तिने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कतरिनाच्या भावाला मुंबईत आणि राजस्थानमध्ये त्याच्या बहिणीच्या लग्नात पाहिलं गेलं होतं. इलियानाला तो गेल्या सहा महिन्यांपासून डेट करत असल्याचं म्हटलं जातंय.

Ileana D'Cruz | अखेर इलियानाने पोस्ट केला मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो; कोण आहे होणाऱ्या बाळाचा पिता?
Ileana D'CruzImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 3:36 PM

मुंबई : अभिनेत्री इलियाना डिक्रूझने एप्रिल महिन्यात गरोदर असल्याचं जाहीर करत सर्वांना सुखद धक्का दिला. मात्र बाळाचा होणारा पिता कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर अद्याप चाहत्यांना मिळालेलं नाही. प्रेग्नन्सी जाहीर केल्यापासून इलियाना सोशल मीडियावर तिचे बरेच फोटो पोस्ट करतेय. नुकतेच तिने बेबीमूनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यात पहिल्यांदा इलियानाचा मिस्ट्री मॅन पहायला मिळाला आहे. डिनर डेटचा हा फोटो पोस्ट असून इलियानाचा बॉयफ्रेंड असल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

इलियानाने बॉयफ्रेंडचा हात आपल्या हातात घेतल्याचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय ‘माझी रोमान्सची कल्पना. त्याला शांतपणे जेवू देत नाहीये.’ यामध्ये इलियनाच्या हातावर डायमंड रिंगसुद्धा पहायला मिळतेय. मात्र तिचा हा बॉयफ्रेंड कोण आहे यावरून अद्याप पडदा उचलण्यात आला नाही.

18 एप्रिल रोजी लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. ‘.. आणि प्रवासाला सुरुवात’ असा मजकूर त्या ड्रेसवर लिहिलेला होता. तर आणखी एका फोटोमध्ये इलियानाच्या गळ्यात एक पेंडंट पहायला मिळालं होतं. ‘मम्मा’ अशा अक्षरांचा तो पेंडंट होता. हे दोन्ही फोटो पोस्ट करत इलियानाने कॅप्शनमध्ये ‘लवकरच..’ असं लिहिलं होतं.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून इलियाना ही अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची चर्चा होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासोबत हे दोघं पार्टी करतानाही दिसले होते. त्यामुळे बाळाचा होणारा पिता हा सेबॅस्टियन तर नाही ना, असाही सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे.

इलियाना बरीच वर्षे अँड्र्यू नीबोन या ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरला डेट करत होती. हे दोघं लग्न करणार अशीही चर्चा होती. मात्र 2019 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर इलियानाचं नाव कतरिनाच्या भावाशी जोडलं गेलं. मात्र या दोघांनी सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर कधीच त्याची कबुली दिली नाही.

इलियाना सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र खासगी आयुष्यामुळे तिने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कतरिनाच्या भावाला मुंबईत आणि राजस्थानमध्ये त्याच्या बहिणीच्या लग्नात पाहिलं गेलं होतं. इलियानाला तो गेल्या सहा महिन्यांपासून डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. इलियानाने कतरिनाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये विकी कौशल, कतरिना कैफ, इलियाना, सेबॅस्टिनय, इसाबेल कैफ, आनंद तिवारी आणि मिनी माथुर पहायला मिळाले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.