AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इमली’ फेम अभिनेत्रीचा अपघात; ट्रकने कारला नेलं फरपटत, असा वाचला जीव

शूटिंगवरून घरी परतताना प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीला अपघात; ट्रकने कारला दिली धडक अन..

'इमली' फेम अभिनेत्रीचा अपघात; ट्रकने कारला नेलं फरपटत, असा वाचला जीव
Hetal YadavImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 06, 2022 | 11:28 AM
Share

मुंबई: स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री हेतल यादव हिचा नुकताच अपघात झाला. रविवारी रात्री शूटिंग संपल्यानंतर घरी परतताना हेतलच्या कारला एका ट्रकने धडक दिली. सुदैवाने या अपघातात हेतलला कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताच्या वेळी हेतल स्वत: कार चालवत होती. ‘इमली’ या मालिकेत हेतल सध्या शिवानी राणा ही भूमिका साकारतेय.

“मी रात्री पावणे नऊच्या सुमारास सेटवर पॅकअप केलं. त्यानंतर फिल्म सिटीमधून घरी निघाली. मी स्वत:च कार चालवत होती. JVLR हायवेवर पोहोचले तेव्हा एका ट्रकने माझ्या कारला मागून धडक दिली आणि धक्का मारत कारला हायवेच्या किनाऱ्यापर्यंत आणलं. माझी कार खाली पडणारच होती, तितक्यात मी धाडस करून कशीबशी कार थांबवली आणि मुलाला कॉल केला”, असा धक्कादायक अनुभव हेतलने सांगितला.

View this post on Instagram

A post shared by Hetal Yadav (@hetalyadav13)

“मुलाला कॉल करून मी त्याला पोलिसांना या अपघाताविषयी माहिती देण्यास सांगितलं. कारण मी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते. सुदैवाने मला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र जे काही घडलं, त्यातून मी अजून सावरू शकले नाही”, असं ती पुढे म्हणाली.

हेतल गेल्या 25 वर्षांपासून अभिनयक्षेत्रात सक्रीय आहे. तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत ज्वालाची भूमिका साकारली होती. याच भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. सध्या ती ‘इमली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.