गरोदर पत्नीला दिला घटस्फोट; एक दोन नाही तर, तीन लग्न केलेल्या अभिनेत्याचं हृदयद्रावक निधन

एक दोन नाही तब्बल ५ वर्ष प्रसिद्ध अभिनेत्याने सोसल्या मरण यातना... पहिल्या पत्नीला प्रेग्नेंसीमध्ये घटस्फोट दिल्यानंतर दोनवेळा थाटला संसार, पण अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ

गरोदर पत्नीला दिला घटस्फोट; एक दोन नाही तर, तीन लग्न केलेल्या अभिनेत्याचं हृदयद्रावक निधन
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 1:03 PM

मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेते चाहत्यांच्या मनात स्वतःचं घर करु शकले, पण त्यांना खसगी आयुष्यात मात्र अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला होता. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता इंदर कुमार… इंदर कुमार याने एक काळ बॉलिवूड गाजवला होता. अभित्याला यश मिळालं, पण त्याने खासगी आयुष्यात मात्र अनेक संकटांचा सामना केला. अभिनेत्याने तीन वेळा लग्न केलं. तिसऱ्या लग्नानंतर अभिनेत्याच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. पण २०१७ मध्ये अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबात आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजली…

करियर यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्याने सोनल नावाच्या एका मुलीसोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा इंदर आणि सोनल यांचं घटस्फोट झाला तेव्हा अभिनेत्याची पहिली पत्नी गरोदर होती. घटस्फोटानंतर सोनल हिने मुलीली जन्म दिला. इंदर आणि सोनल यांच्या मुलीचं नाव खुशी आहे..

सोनल हिच्याापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्याने २००९ मध्ये दुसरं लग्न केलं. अभिनेत्याने दुसरं लग्न कमलजीत कौर नावाच्या एका मुलीसोबत केलं. अभिनेत्याचं दुसरं लग्न फक्त दोन महिने टिकलं.. दोन महिन्यानंतर इंदर आणि कमलजीत कौर यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

दुसरं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्याने तिसरं लग्न पल्लवी श्रॉफ हिच्यासोबत केलं. २०१३ मघ्ये पल्लवी आणि इंदर यांनी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर पल्लवी हिने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव भावना आहे. पण अभिनेता तिसऱ्या लग्नानंतर जास्त काळ जगू शकला नाही.. २०१७ मध्ये इंदर याने वयाच्या ५० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

इंदर कुमार यांनी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयु्ष्यात अनेक अडचणींचा सामना केला. पण मृत्यूपूर्वी अभिनेता पाच वर्षे अंथरुणाला खिळून राहिला होता. त्याच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. इंदर याने ‘खिलाडियों का खिलाडी’ सिनेमानंतर मासूम’, ‘तिरछी टोपी वाले’, ‘बागी’, ‘कही प्यार ना हो जाए’, ‘हथियार’ आणि ‘तुमको ना भूल पाएंगे’ यांसारख्या सुपरहीट सिनेमांमध्ये काम केलं होतं.

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.