Gadar 2 | सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटाबाबत भारतीय सैन्याकडून भूमिका जाहीर

या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लखनऊ आणि महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पाकिस्तानसारखा सेट तयार करण्यात आला होता. गदर 2 मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये 50 दिवस शूटिंग करण्यात आली होती.

Gadar 2 | सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाबाबत भारतीय सैन्याकडून भूमिका जाहीर
Gadar 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 12:21 PM

नवी दिल्ली : 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. तारा सिंग आणि सकीनाच्या प्रेमकहाणीने बरीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता तब्बल 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित होणार आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल हे पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकीनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ या चित्रपटाबाबत आता भारतीय सैन्याकडून भूमिका जाहीर करण्यात आली आहे. भारतीय सैन्याकडून या चित्रपटाला ना हरकत प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी झाली आहे.

भारतीय सैन्याकडून चित्रपटाला हिरवा कंदील

देशातील कोणत्याही लष्करावर आधारित चित्रपटाला प्रदर्शनापूर्वी संरक्षण मंत्रालयाच्या पूर्वावलोकन समितीकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळवण्याची गरज असते. याचसाठी गदर 2 च्या निर्मात्यांनी अलीकडेच या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. या स्क्रिनिंगनंतर अधिकाऱ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. संरक्षण मंत्रालयाच्या समितीकडून केवळ या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला नाही तर त्यांच्याकडून चित्रपटाचं भरभरून कौतुकसुद्धा झालं.

गदर : एक प्रेम कथा या चित्रपटाची कथा भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हा चित्रपट ब्रिटिश सैन्यात माजी सैनिक असलेल्या बूटा सिंगवर आधारित असल्याचं म्हटलं जातं. फाळणीच्या वेळी झालेल्या जातीय दंगलीत त्यांनी वाचवलेल्या झैनब या मुस्लिम मुलीसोबतच्या त्यांच्या प्रेमकथेवर चित्रपटाची कथा आधारित असल्याचं म्हटलं गेलंय. यामध्ये सनी देओल, अमीषा पटेलसोबतच अमरिश पुरी यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

हे सुद्धा वाचा

शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात पाकिस्तानी जनरल कादिरची भूमिका साकारलेला अभिनेता मनीष वाधवा ‘गदर 2’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे. गदर 2 मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लखनऊ आणि महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पाकिस्तानसारखा सेट तयार करण्यात आला होता. गदर 2 मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये 50 दिवस शूटिंग करण्यात आली होती. तर अहमदनगरमध्ये 25 दिवसांची शूटिंग झाली होती. गदर 2 मधील ॲक्शन सीन्ससाठी टीनू वर्मा आणि साऊथचे रवी वर्मा यांची मदत घेण्यात आली. यांनी शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील ॲक्शन सीन्सवर काम केलं होतं. याशिवाय विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांचंही चित्रपटाच्या ॲक्शन सीन्समध्ये मोठं योगदान आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.