Dharmendra | इंडस्ट्रीचं देओल कुटुंबाकडे दुर्लक्ष? अनेक वर्षांनंतर धर्मेंद्र अखेर व्यक्त झालेच
Dharmendra | धर्मेंद्र यांनी सुपरहीट सिनेमे दिले, तरी देखील देओल कुटुंबाची इंडस्ट्रीने नाही घेतली दखल, नक्की काय आहे सत्य ? धर्मेंद्र यांच्याकडून मोठं सत्य अखेर समोर... सध्या सर्वत्र देओल कुटुंबाची चर्चा...
मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : सध्या अभिनेते सनी देओल ‘गदर २’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहेत आणि त्यांच्यामुळे संपूर्ण देओल कुटुंब प्रसिद्धीझोतात आलं आहे. सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर ‘गदर २’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. सिनेमा येत्या काही दिवसांत किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सनी देओल यांच्या ‘गदर २’ सिनेमाचा सर्वोत्र बोलबाला असताना अभिनेते धर्मेंद्र यांनी व्यक्त केलेली खंत फार थक्क करणारी आहे. धर्मेंद्र यांनी इंडस्ट्रीच्या दुसऱ्या बाजूबद्दल सांगितलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
धर्मेंद्र म्हणाले, ‘देओल कुटुंबाने इंडस्ट्रीमध्ये एवढं काम केलं. पण कोणीही देओल कुटुंबाचं कौतुक केलं नाही. इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या योगदानाची कोणी दखल घेतली नाही. देओल कुटुंब कोणत्याही प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर लक्ष देत नाही. आमचं काम आमच्यासाठी सर्वकाही आहे… यावर आमचा विश्वास आहे…’
पुढे धर्मेंद्र म्हणाले, ‘माझा मुलगा सनी देओल याने दोन ब्लॉकबास्टर सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. पण मी काय – काय मिळवलं आहे… याबद्दल त्याने कधीही बोलून दाखवं नाही… माझा लहान मुलगा बॉबी देओल याने देखील इंडस्ट्रीमध्ये उत्तम काम केलं आहे. पण माझ्या कुटुंबाचं कधीही कौतुक झालं नाही. याचं देखील आम्हाला कधी वाईट वाटलं नाही.. ‘ असं देखील धर्मेंद्र म्हणाले…
चाहत्यांबद्दल धर्मेंद्र म्हणाले, ‘चाहत्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम आमच्यासाठी सर्व काही आहे. चाहत्यांचं प्रेमचं आम्हाला आणखी उत्तम काम करण्यासाठी प्रेरित करतो. आम्हाला इंडस्ट्रीकडून होणाऱ्या कौतुकाची गरज नाही..’ सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या वक्तव्याची चर्चा तुफान रंगत आहे. सांगायचं झालं तर एक काळ होता जेव्हा धर्मेंद्र यांनी बॉलिवूडवर राज्य केलं.
आज देखील धर्मेंद्र यांचे सिनेमे चाहते तितक्यात आवडीने पाहतात. ‘शोले’ सिनेमातील डायलॉग आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. तर, धर्मेंद्र नुकताच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यामातून चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला.
धर्मेंद्र यांनी ‘अपने’, ‘धरम वीर’, ‘सीता और गीता’, ‘लोहा’, ‘आखें’, ‘यमला पागल दिवाना’, ‘हुकुमत’, ‘अलिबाबा ४० चोर’, ‘मेरा गाव मेरा देश ‘… यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत धर्मेंद्र यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. तर आता धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल यांची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे.