दिशा सालियानच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलवरुन इंटरनेट कॉलिंग, कॉल नेमके कोणी केले? तपास नाही
सुशांतची माजी मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियनबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे (Internet calling made by Disha Salian phone after her death).
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानने 8 जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली. दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येची एकच लिंक आहे का? यावरुन चर्चा सुरु होती. मात्र सुशांतची माजी मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियनबद्दलही महत्वाची माहिती समोर आली आहे (Internet calling made by Disha Salian phone after her death).
दिशा सालियानच्या मृत्यूनंतरही तिच्या मोबाईलवरुन इंटरनेट कॉलिंग झाल्याचं समोर आलं आहे. मात्र हे कॉल नेमकं कोणी केले? याचा अजून तपास लागलेला नाही. पण मुंबई पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येची चौकशी करताना मोबाईलचा तपास केला नव्हता का? हाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय (Internet calling made by Disha Salian phone after her death).
दिशा सालियानच्या आत्महत्येनंतरही तिचा मोबाईल सुरुच होता. 17 जूनपर्यंत मोबाईल सुरु राहिला असून त्यावरुन इंटरनेट कॉलिंग केल्याचंही समोर आलं आहे. आता हा मोबाईल नक्की कोणाकडे होता? हे अजून समोर आलेलं नाही. मोबाईलबद्दल मुंबई पोलिसांच्या लक्षात कसं आलं नाही? हा मुद्दा आता समोर आला आहे.
दरम्यान, सीबीआयने सोमवारी (24 ऑगस्ट) पुन्हा एकदा सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, कूक निरज सिंह यांची कसून चौकशी केली. तेच सध्या सीबीआयच्या चौकशीचे फोकस आहेत. कारण ते दोघं सुशांतच्या फ्लॅटवर नेहमीच असायचे. त्यामुळे 8 जून रोजी असं काय झालं की रिया सुशांतला सोडून गेली? याचं उत्तर सीबीआयला हवं आहे.
मुंबईत दाखल झाल्यापासून सीबीआयच्या तपासात चौथ्या दिवशी एका नव्या व्यक्तीची भर पडली. ती व्यक्ती म्हणजे सुशांतचा जुना अकाऊंटट रजत मेवाती. हा तोच अकाऊंटट आहे, ज्याने रियामुळे नोकरी गमावली होती. रजत मेवाती याने जानेवारी 2020 पर्यंत सुशांतच्या अकाऊंटचं काम पाहिलं. रियानं मेवातीला कामावरुन काढून टाकलं होतं. सीबीआयने मेवातीकडून सुशांतच्या आर्थिक व्यवहार समजून घेण्याचा प्रयत्न केला.
सुशांतच्या बँक खात्यातून रिया पैसे खर्च करत असल्याचं याआधीही समोर आलं आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर 15 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सीबीआयची टीम कोटक महिंद्रा बँकेतही पोहोचली. सीबीआयने सुशांतच्या बँक खात्याची डिटेल्स घेतल्याची माहिती आहे. याआधीही बिहार पोलिसांनीही कोटक महिंद्रा बँकेत येऊन चौकशी केली होती. त्यानंतर सीबीआयही आता आर्थिक अँगलनेसुद्धा तपास करत आहे.
संबंधित बातम्या :
सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप, संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर