AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Animal Teaser | ‘ॲनिमल’च्या टीझरमध्ये बॉबी देओलने दिला झटका; त्या एका सीनची जोरदार चर्चा

अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या बहुप्रतिक्षित 'ॲनिमल' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. रणबीरच्या वाढदिवसाचं औचित्य साधत हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये रणबीर आणि रश्मिकासोबतच बॉबी देओलच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

Animal Teaser | 'ॲनिमल'च्या टीझरमध्ये बॉबी देओलने दिला झटका; त्या एका सीनची जोरदार चर्चा
ॲनिमल टीझरImage Credit source: Youtube
| Updated on: Sep 28, 2023 | 4:51 PM
Share

मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : अभिनेता रणबीर कपूरच्या 31 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘ॲनिमल’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना ही नवी जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र पहायला मिळणार आहे. जवळपास अडीच मिनिटाच्या या टीझरमध्ये रणबीरचा जबरदस्त अंदाज पहायला मिळाल. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या कथेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण करण्यात हा टीझर यशस्वी झाला. मात्र या सर्वांपेक्षा टीझरमधील एका सरप्राइजची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. हा सरप्राइज म्हणजे अभिनेता बॉबी देओल. ॲनिमलच्या टीझरच्या अखेरीस काही सेकंदांसाठी त्याची झलक पहायला मिळते. मात्र ही झलक पाहिल्यानंतर बॉबी देओल अत्यंत हटके भूमिका साकारणार असल्याचं सहज स्पष्ट होत आहे.

या टीझरच्या अखेरीस बॉबी देओल दरवाजा उघडतो. त्याचा शर्टलेस लूक आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तो यामध्ये खलनायक साकारणार असल्याचं कळतंय. या चित्रपटात रणबीर, रश्मिका आणि बॉबीशिवाय अभिनेते अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अनिल कपूर हे रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. संदीप रेड्डी वांगाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी त्याने शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

पहा टीझर

या टीझरच्या सुरुवातीलाच अनिल कपूर हे रणबीरच्या कानाखाली वाजवताना दिसतात. पत्नीला म्हणतात, “ज्योती, हमने क्रिमिनल पैदा किया है”. त्यानंतर रणबीर रश्मिकाला म्हणतो दिसतोय की, ‘माझे वडील हे जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहेत.’ टीझरनमध्ये रणबीरचा रफ-टफ लूक आणि दमदार ॲक्शन सीन्ससुद्धा पहायला मिळतात.

ॲनिमल हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र त्याच दिवशी सनी देओलचा ‘गदर 2’ आणि अक्षय कुमार-पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड 2’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. एकाच वेळी बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर टाळण्यासाठी अखेर ॲनिमलच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.