Ira Khan | आमिर खान-रिना दत्ताच्या ‘या’ निर्णयामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकली लेक; खुद्द आयराने केला खुलासा

नैराश्यातून बाहेर येण्याच्या या प्रवासात वडील आमिर खान, आई रिना दत्ता आणि सावत्र आई किरण राव यांच्याकडून मदत मिळत असल्याचंही आयराने सांगितलं. या सर्वांसोबत तिचा एक चॅट ग्रुप आहे आणि जेव्हा कधी गरज असेल तेव्हा ती त्यांची मदत घेते.

Ira Khan | आमिर खान-रिना दत्ताच्या 'या' निर्णयामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकली लेक; खुद्द आयराने केला खुलासा
आमिर खान-रिना दत्ताच्या 'या' निर्णयामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकली लेकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 9:00 PM

मुंबई | 8 ऑगस्ट 2023: आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आयरा खान अनेकदा नैराश्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयराने तिच्या डिप्रेशनसाठी पालकांच्या घटस्फोटाला जबाबदार ठरवलं आहे. आईवडिलांचा घटस्फोट हा परस्पर संमतीने जरी असला तरी त्याचा तिच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाल्याचं ती म्हणाली. पाच वर्षांपूर्वी आयराला क्लिनिकल डिप्रेशनचं निदान झालं होतं. याविषयी ती वेळोवेळी सोशल मीडियावर व्यक्त झाली.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आयराने सांगितलं की तिच्या थेरपीस्टच्या मते, तिच्या पालकांचा घटस्फोट हा नैराश्याचा ट्रिगर पॉईंट होता. पण माझ्या मानसिक स्थितीसाठी मी आईवडिलांना दोष देत नाही, असंही तिने स्पष्ट केलं. घटस्फोट हा काही फार मोठा विषय नाही, असं कुठेतरी आईवडिलांनी आपल्या मनावर बिंबवलं होतं आणि त्याचाच मनावर परिणाम झाल्याचं आयरा यावेळी म्हणाली.

हे सुद्धा वाचा

आईवडिलांनी परस्पर संमतीने घेतलेल्या घटस्फोटानंतर आयराने तिच्या मनात काही समज निर्माण करून घेतले आणि त्याविषयी ती कधीच कोणाकडे व्यक्त झाली नाही. म्हणूनच डिप्रेशनमध्ये गेल्याबद्दल तिने स्वत:ला दोष दिला आणि या गोष्टीवर विश्वास ठेवला की इतरांकडून प्रेम मिळवण्यासाठी दु:खी असण्याची गरज असते. मात्र आयराला आता तिच्या आयुष्यात खुश राहायचं आहे. यासाठी तिने आतापर्यंत जे-जे केलं, ते सर्व तिला पद्धतशीरपणे मागे घ्यायचं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

नैराश्यातून बाहेर येण्याच्या या प्रवासात वडील आमिर खान, आई रिना दत्ता आणि सावत्र आई किरण राव यांच्याकडून मदत मिळत असल्याचंही आयराने सांगितलं. या सर्वांसोबत तिचा एक चॅट ग्रुप आहे आणि जेव्हा कधी गरज असेल तेव्हा ती त्यांची मदत घेते. होणारा पती नुपूर शिखरेकडूनही मोठी साथ मिळाल्याचं आयराने या मुलाखतीत नमूद केलं. गेल्या वर्षी आयरा आणि नुपूरने साखरपुडा केला.

कोण आहे नुपूर शिखरे?

नुपूर हा बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना फिटनेसचं प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे तो उत्तम डान्सरसुद्धा आहे. इतकंच नव्हे तर तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता. नुपूरचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मुंबईत आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. नुपूरची आई प्रीतम शिखरे या नृत्य शिक्षिका आहेत.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या.
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं.
'हे म्हातारं काही थांबणार नाही...' पवारांची भरसभेत विरोधकांवर टोलेबाजी
'हे म्हातारं काही थांबणार नाही...' पवारांची भरसभेत विरोधकांवर टोलेबाजी.
सिद्दिकी पितापुत्रांना एकत्रच मारण्याचा प्लॅन, आरोपींची मोठी कबुली
सिद्दिकी पितापुत्रांना एकत्रच मारण्याचा प्लॅन, आरोपींची मोठी कबुली.
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 'या' 7 नावांची यादी तयार
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 'या' 7 नावांची यादी तयार.
महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजणार, निवडणूक आयोग आज घोषणा करणार
महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजणार, निवडणूक आयोग आज घोषणा करणार.