वयाच्या 60 व्या वर्षी तिसरा संसार थाटणार आमिर खान? लेक क्रिप्टिक पोस्ट करत म्हणाली…
Aamir Khan Love Life: आमिर खान याच्या लेकीला मान्य नाही वडिलांचं नवं प्रेम? आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना आयराची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Aamir Khan Love Life: अभिनेता आमिर खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. आता देखील आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळेच चर्चेत आहे. नुकताच आमिर खान याने नव्या प्रेमाची कबुली दिली. आमिर खान आणि गौरी गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. पण त्यांच्या रिलेशनशिपला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. दरम्यान, आमिर याने कुटुंबियांसोबत देखील गौरीची ओळख करुन दिली आहे. तर आमिर याच्या कुटुंबाने देखील आनंदात गौरीचं स्वागत केलं आहे.
सर्वत्र आमिर आणि गौरी यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु असताना, अभिनेत्याची लेक आयरा खान हिच्या क्रिप्टिक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सध्या आयरा खान हिने केलेली सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. आयरा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या भावना व्यक्त करत असते.
आयरा हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत आयरा म्हणाली, ‘कोणते विचार सतत सुरु आहे…’ यावर आयरा म्हणाला, ‘काहीच नाही…’, आमिर खान याने नव्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आयराने पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयरा खान हिची पोस्ट आणि आमिर खानच्या रिलेशिनशिपची चर्चा रंगली आहे.
तिसरा संसार थाटणार आमिर खान?
नव्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आमिर खान याला तिसरं लग्न करणार का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, ‘मी दोन वेळा लग्न केलं आहे. आता वयाच्या 60 व्या वर्षी लग्न करणं योग्य वाटणार नाही. पण तरी पाहू पुढे काय होईल…’ असं आमिर म्हणाला आहे.
आयरा खान हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आयरा हिने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केलं आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आयरा पती नुपूर याच्यासोबत देखील कायम फोटो पोस्ट करत असते.