सलमान खानच्या चित्रपटात रश्मिका मंदान्ना ‘भूत’ आहे? ‘सिकंदर’मधले हे फोटो पाहाच
सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'सिकंदर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. भाईजानच्या चाहत्यांसाठी हा क्षण खूप खास आहे कारण सलमानने त्याच्या चाहत्यांना ही ईदची भेट दिली आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर मनोरंजक आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना भूत असल्याच्या चर्चा आहेत.

सलमानचे चित्रपट पाहणारा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना वेगवेगळ्या पात्रांसोबत जास्त एक्सपेरिमेंट्स करताना पाहायला आवडत नाही. सलमानचा एक निष्ठावंत चाहता वर्ग आहे आणि त्याच्या प्रेक्षकांना त्याला कसं पाहायला आवडेल हे सलमानला चागलंच माहिती आहे. सिकंदरमध्येही सलमानला पाहायला आता सगळेच प्रेक्षक आतुर आहे. चित्रपटात रश्मिकाचा समावेश करून संपूर्ण भारतातील प्रेक्षकांना एक नवीन प्रयोग करण्याचा मात्र प्रयत्न केला आहे.
रश्मिकाला उच्चारावरून नेहमी ट्रोल केलं जातं
रश्मिकाबद्दल बोलायचं झालं तर, तिचा अभिनय तिच्या रेकॉर्डइतकाच मजबूत आहे. पुष्पा 2, अॅनिमल आणि छावानंतर, रश्मिकाला लकी चार्म मानलं जातं आहे. पण लोकांची एकच तक्रार आहे ती म्हणजे तिच्या संवाद सादरीकरणाबद्दल. रश्मिकाच्या उच्चारावरून तिला हिंदीची समस्या असल्याचं दिसून येते. रश्मिकाची ही समस्या सिकंदरमध्येही दिसते, पण तिने तिच्या या समस्येवर काम केले आहे. या चित्रपटात ती साईश्रीची भूमिका साकारत आहे, तर सलमानच्या पात्राचे नाव संजय राजकोट आहे.

Rashmika Mandanna a ghost in Salman Khan Sikander?
चित्रपटात रश्मिका भूत असल्याच्या चर्चा
रश्मिकाची व्यक्तिरेखा या चित्रपटातील एक मोठा सस्पेन्स आहे. या चित्रपटात रश्मिका भूत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना याबद्दल जाणून घेण्याची इच्छाही आहे. सिकंदरमध्ये सलमानच्या पत्नी किंवा प्रेयसीची भूमिका साकारणारी रश्मिका मरेल आणि सिकंदर त्याचा बदला घेण्यासाठी लढेल असा काही अंदाज आहे. जरी ट्रेलरमध्ये याबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती देण्यात आलेली नसली तरी, रश्मिका आणि सलमानचे बहुतेक दृश्ये काळजीपूर्वक पाहिली तर ते एकतर खूप गडद स्वरात आहेत किंवा कॅमेरा थोडासा पॅन केलेला आहे, ज्यामुळे फ्रेम वाकडी दिसते. अशा दृश्यांचा वापर अनेकदा गूढता निर्माण करण्यासाठी केला जातो.
हॉरर चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे
याशिवाय, रश्मिकाचे संवाद, बाम बाम भोले हे गाणे आणि ट्रेलरमधील रश्मिकाचे गाणे जिथे ती दिवंगत लता मंगेशकर यांचे ‘लग जा गले’ हे गाणे गात आहे. हे गाणे ‘वो कौन थी’ या सुपरहिट चित्रपटातील आहे, जो एक काल्पनिक हॉरर चित्रपट आहे. हे गाणे गाताना, जेव्हा ‘शायद फिर इस जनम मे मुलकात हो ना हो…’ ही ओळ येते तेव्हा सलमान रश्मिकाला थांबवतो, म्हणजेच सिकंदरला त्याच्या पत्नीने ही ओळ म्हणू नये असे वाटतं. या गाण्याला या मालिकेत खूप विचारपूर्वक घेण्यात करण्यात आले आहे. रश्मिका असेही म्हणते की आतापर्यंत “तु माझ्यासाठी लढलात, आता त्या तिघांसाठी लढ” या दृश्यातूनही असाच एक अनुभव येत आहे.
View this post on Instagram
प्रतीक बब्बरचीही महत्त्वाची भूमिका
या चित्रपटात प्रतीक बब्बरचीही महत्त्वाची भूमिका आहे. तो खलनायक आहे. जर ट्रेलरमध्येही असेच काहीसे दखवण्यात आले आहे. चित्रपटातील संवादांबद्दल बोलायचे झाले तर, ‘तो राजकोटचा राजा आहे…’, ‘किंवा तू मला बाहेर शोधत आहेस… आणि मी तुझ्या घरात तुझी वाट पाहत आहे…’ असे संवाद मजेदार आहेत. चित्रपटात असे अनेक संवाद आहेत जे सलमानच्या व्यक्तिरेखेला साजेसे असतील आणि हे निश्चितच आहे की जेव्हा असे संवाद सलमानच्या तोंडून येतात तेव्हा थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्या वाजतात.
शर्मन जोशी अन् सलमानची जोडी
चित्रपटात शर्मन जोशी देखील आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला सलमान खानचा वॉन्टेडचा पोस्टर दाखवण्यात आला आहे. फक्त सलमानच नाही तर त्याच्या टोळीचे वॉन्टेड पोस्टर्स देखील दिसत आहेत, ज्यामुळे सलमान आणि त्याच्या टोळीला काही खोट्या आरोपात अडकवण्यात आलं आहे हे स्पष्ट होते. या दृश्यात शर्मनचा पोस्टर देखील आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की शर्मन हा सलमानचा विश्वासू मित्र असतो. त्याचबरोबर सलमान आणि शर्मनच्या जोडीतून चित्रपटात विनोदाचीही झलक पाहायला मिळू शकते. एकंदरितच चित्रपटाबद्दल होणाऱ्या वेगवेगळ्या चर्चा पाहता प्रेक्षकांमध्ये नक्कीच चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.